दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त

| Updated on: Feb 27, 2021 | 8:55 PM

अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 32 वर्षीय युवकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राम येथे समोर आली आहे (Gurugram man killed his wife On suspicion of immoral relations).

दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त
Crime-News
Follow us on

गुरुग्राम (हरीयणा) : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 32 वर्षीय युवकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राम येथे समोर आली आहे. पत्नीची हत्या करुन तो उत्तर प्रदेशात आपल्या गावी पळाला होता. मात्र, मृत महिलेच्या भावाने याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर उत्तप प्रदेश पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे (Gurugram man killed his wife On suspicion of immoral relations).

नेमकं प्रकरण काय?

आरोपी सतीश कुमार हा एका खासगी फर्ममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याचं आठ वर्षांपूर्वी रुबी नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. दोघांना दोन लहान मुलं आहेत. मात्र, सतीशला आपल्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय होता. याच संशयावरुन त्याने भयानक आणि क्रूर कृत्य केलं (Gurugram man killed his wife On suspicion of immoral relations).

पत्नीला शनी मंदिरातून फरफटत घरी नेलं

सतीशची पत्नी रुबी ही 14 फेब्रुवारीला शनी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. याबाबत त्याला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा तो देखील शनी मंदिरात पोहोचला. तिथे त्याने पत्नीला सर्वांसमोर प्रचंड मारहाण केली. सतीश कुमार पत्नी रुबीला प्रचंड मारहाण करत फरफटत घरी घेऊन गेला. घरी पोहोचल्यावरही त्याने पत्नीला शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याने पत्नीला इतकं मारलं की तिचा त्यामध्ये अखेर जीव गेला. या भयान घटनेनंतर तो रुबीला घरात एकटा सोडून आपल्या गावी पळून गेला.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

थोड्या वेळाने घरातून कोणताही आवाज येत नाही हे शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात बघितलं तर रुबीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडला होता. त्यांनी तातडीने रुबीच्या दिल्लीत राहणाऱ्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली. रुबीचा भाऊ अक्षय सिंहने सतीश कुमारच्या विरोधातल पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुरुग्राम सेक्टर 17/18 पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस गेल्या दोन आठवड्यांपासून आरोपी सतीशच्या शोधात होते. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी सतीशला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

हेही वाचा : अमेरिकेने भारताकडून 15 लाख कोटींचे घेतले कर्ज; प्रत्येक अमेरिकन व्यक्तीवर 60 लाखांचे कर्ज