हायटेक चोर, विमानातून प्रवास करत चोरीचे ठिकाण गाठायचे, पण शेवटी…

| Updated on: Apr 03, 2024 | 9:54 AM

Pune Crime News: दुकाने, शोरुममध्ये गेल्यावर आरोपी कपडे ट्रायल करण्यासाठी घेऊन जात होते. कपड्यांवर असलेले सिक्युरिटी आणि बारकोड टॅग तोडून टाकत होते. त्यानंतर एकावर एक कपडे घालून ते शोरुम किंवा मॉलमधून बाहेर पडत होते. संपूर्ण देशांत मोठ-मोठ्या शोरुममध्ये ते या पद्धतीने चोरी करत होते

हायटेक चोर, विमानातून प्रवास करत चोरीचे ठिकाण गाठायचे, पण शेवटी...
Follow us on

भुरटे चोर छोट्यामोठ्या चोऱ्या करतात. दरोडेखोर मोठ मोठ्या रक्कमा आणि दागिने लंपास करतात. परंतु हायटेक चोर आता तयार होऊ लागले आहे. हे चोर विमानातून चोरी करण्यासाठी लांब लांबच्या शहरात येतात. त्या ठिकाणी कार भाड्याने घेतात. मोठमोठ्या शोरुममध्ये जातात आणि ब्रॅण्डेड वस्तूंची चोरी करतात. पुणे पोलिसांनी अशा तीन हायटेक चोरांना अटक केली आहे. हे चार चोर राजस्थानमधील आहेत.

यांना केली अटक

राजस्थानमधील रहिवाशी असलेले गौरवकुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९, दोघे रा. गणीपूर, जिल्हा दौसा, राजस्थान), टोळीप्रमुख योगेशकुमार लक्ष्मी मीना (वय २५ रा. सूरोड, जिल्हा करौली, राजस्थान) आणि सोनुकुमार बिहारीलाल मीना (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. चोरी करण्यासाठी ते जयपूर ते मुंबई असा विमान प्रवास करत होते. मग मुंबईत पोहचल्यावर ते अ‍ॅपच्या मदतीने गाडी बुक करत होते. त्यानंतर बड्या मॉलमध्ये जाऊन बॅण्डेड कपडे आणि बूटांची चोरी करत होते.

असे आले जाळ्यात

चौघे आरोपी चोरी करुन एका बँडेंड कपड्यांच्या दुकानातून बाहेर पडत होते. त्यावेळी एक्झिट गेटवर सिक्युरिट अलार्म वाजला. त्यामुळे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. सुरक्षा रक्षकाने तत्परता दाखवत त्यातील दोघांना पकडले. त्यानंतर त्यांच्या टोळीतील प्रमुख योगेश मीना याला खडकी बाजार येथील हॉटेलमध्ये पकडले. तर आणखी एक आरोपी सोनू मीना याला पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. तसेच दुकानाच्या परिसरात उभी असणाऱ्या त्यांच्या कारची झडती घेतली. त्यात ब्रँडेड कंपन्यांचे कपडे, बूट, बेल्ट सापडले.

हे सुद्धा वाचा

कशी करत होते चोरी

दुकाने, शोरुममध्ये गेल्यावर आरोपी कपडे ट्रायल करण्यासाठी घेऊन जात होते. कपड्यांवर असलेले सिक्युरिटी आणि बारकोड टॅग तोडून टाकत होते. त्यानंतर एकावर एक कपडे घालून ते शोरुम किंवा मॉलमधून बाहेर पडत होते. संपूर्ण देशांत मोठ-मोठ्या शोरुममध्ये ते या पद्धतीने चोरी करत होते. त्यांच्याकडून सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.