औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात एक अतिशय़ धक्कादयक असा प्रकार घडलाय. बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केलीय. ही हत्या अतिशय अमानुषपणे करण्यात आली असून यामध्ये भावाने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे. हत्या करुन आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला. त्याने बहिणीला घरी भेटायला येण्यास गळ घातली. तसेच बहीण घरी येताच त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
या हल्ल्यात प्रेमविवाह केलेली तरुणी गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी असलेला तरुणीचा भाऊ फक्त एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे होईपर्यंत कोयत्याने मानेवर वार केले. सपासप वार केल्यामुळे तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण माहाराष्ट्र हादरलाय.
दरम्यान ऑनर किलिंगच्या या प्रकरामुळे औरंगाबादसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने बहिणीचा खून करून वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय.
इतर बातम्या :