दोघांचे प्रेमसंबंध होते. पुढे प्रेमाच रुपांतर लग्नात झालं. पण लग्नानंतर काही तासातच नवऱ्याने नव्या नवरीची कुऱ्हाडीने हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच कुऱ्हाडीने स्वत:वर वार केले. त्यामुळे त्याचा सुद्धा मृत्यू झाला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले आहेत. कर्नाटकच्या कोलारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री मध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 7 ऑगस्टला धुमधडाक्यात दोघांच लग्न झालं. दोघांचा मित्र परिवार, नातेवाईक लग्नामध्ये सहभागी झाले. लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत वेळ घालवला.
त्यानंतर दोघे एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी नवीन आणि लिखितामध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन मोठा वाद झाला. दोघांमध्ये वाद इतका वाढला की, मारहाण सुरु झाली. नवीनने संतापाच्याभरात लिखिता श्री वर धारदार कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीने स्वत:वर वार केले. नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडून आता प्रवेश केला, त्यावेळी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
पोलिसांची टीम पोहोचली
लगेचच दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केलं. नवीन तो पर्यंत जिवंत होता. तो गंभीररित्या जखमी झालेला. त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय.