सध्या सगळ्या देशात सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दीड तासाचा एक व्हिडिओ बनवला. त्यात आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरकडच्या मंडळींना जबाबदार ठरवलं आहे. बिहारच्या समस्तीपूरमधील अतुल सुभाषची यूपी जौनपूरच्या निकिता सिंघानिया बरोबर 2019 साली एका मॅट्रीमोनियल साइटवर ओळख झाली होती. निकिताने बीटेक कॉम्प्यूटर सायन्स आणि एमबीए फायनान्समध्ये शिक्षण घेतलं होतं. अतुल पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. दोघांच लग्न ठरल्यानंतर आम्हाला हे लग्न लवकर करायचय असं निकिताच्या कुटुंबाने सांगितलं. कारण निकिताच्या वडिलांची तब्येत चांगली नव्हती. ते आजारी असायचे. त्यामुळे त्यांच्या जिवंतपणी मुलीच लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती.
दोघांच लग्न वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये झालं. त्यानंतर निकिता सासरी आली. अतुलच्या चुलत भावाच्या सांगण्यानुसार निकिता दोनच दिवस सासरी राहिली. नंतर ती नवऱ्यासोबत बंगळुरुला निघून गेली. सुरुवातील सगळं व्यवस्थित होतं. पण बाळ झाल्यानंतर त्यांच्या भांडण वाढली. निकिता मुलगा व्योमला घेऊन माहेरी जौनपुरला निघून आली.
120 वेळा कोर्टात यावं लागलं
निकिताने जौनपूरमध्ये अतुल आणि त्याच्या कुटुंबावर 9 केसेस टाकल्या. 6 लोअर कोर्टात आणि तीन हायकोर्टात. त्यामुळे अतुलला अनेकदा जौनपूरला जावं लागलं. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या 24 पेजच्या सुसाइड नोटमध्ये अतुल सुभाषने त्याचा छळ झाल्याच लिहिलं आहे. हुंड्याची केस टाकल्याने बंगळुरुतून त्याला स्वत:ला, छोट्या भावाला दिल्लीतून आणि वृद्ध आई-वडिलांना बिहारमधून जवळपास 120 वेळा उत्तर प्रदेश जौनपूरला यावं लागलं. ज्या माणसाला वर्षभरात 23 सुट्ट्या मिळतात, तो 40 वेळा कोर्टात हजर होण्यासाठी आला.
अनैसर्गिक शरीरसंबंधांचा खटला
अतुल सुभाषने आयुष्य संपवण्याआधी एक व्हिडिओ बनवला. त्याने त्याने म्हटल की, “2022 नंतर गोष्टी संभाळणं हाताबाहेर गेलं. तिने एक हत्येची, दुसरी हुंड्यासाठी छळाची आणि तिसरी अनैसर्गिक शरीरसंबंधांचा खटला दाखल केला होता”
जे काही बोलू ते कोर्टात सर्वांसमोर
बंगळुरुत अतुलच्या भावाने वहिनी निकिता आणि चार जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. सुभाष आत्महत्या प्रकरणात TV9 भारतवर्षची टीम त्याच्या सासरी पोहोचली. निकिताच सिंघानियाच माहेर जौनपूर खोवा मंडीमध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाऊ आणि आईने जे काही बोलू ते कोर्टात सर्वांसमोर असं सांगितलं,