पंजाब : पती-पत्नीमधील वादा (Dispute)तून पत्नीसह सासरच्या मंडळींवर धारदार शस्त्राने वार (Attack) केल्याची घटना पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील तातरिये वाला गावात घडली आहे. त्यानंतर हल्लेखोराने आपल्या गावी जाऊन स्वतःही आत्महत्या (Suicide) केली. गुरुमुख सिंह असे आत्महत्या करणाऱ्या हल्लेखोराचे नाव आहे. या हल्ल्यातील जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना फरीदकोट येथे रेफर करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
या हल्ल्यात पत्नी, सासरे, सासू, मेहुणी, स्वत:चा मुलगा, मेहुणीचा मुलगा आणि साडू जखमी झाले आहेत. यानंतर गुरुमुख सिंहने खोसा पांडो या गावी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. एसपी मुख्यालयाने सांगितले की, जखमींना फरीदकोटला रेफर करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
खोसा पांडो गावातील गुरुमुख सिंह याचा तातरिये वाला गावातील पीडित महिलेशी 15-16 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये काही घरगुती वाद होते. याबाबत गुरुमुखच्या पत्नीने मेहना पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. सध्या त्याची पत्नी तिच्या माहेरी राहत होती. काल रात्री गुरुमुख सासरवाडीला गेला आणि त्याने पत्नीसह सासरवाडीतील मंडळींवर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. त्यानंतर स्वतःच्या गावी जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून पतीने भररस्त्यात पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये उघडकीस आली आहे. तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. रईस खान असे आरोपी पतीचे नाव आहे. मूळचा राजस्थानचा असलेल्या रईसचा 4 एप्रिल 2019 रोजी भोपाळमधील तरुणीशी विवाह झाला होता. रईस त्याच्या पत्नीवर संशय घेत असे. संशयातून मारहाणही करत असे. नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून महिला माहेरी राहत होती. महिलेने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. याबाबत पतीने पत्नीला भेटण्यास बोलावून पुन्हा एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र महिलेने नकार दिल्याने रईसने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. (Husband commits suicide by attacking his wife and relatives in a domestic dispute in Punjab)