औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका पतीने आपल्या पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य केलं आहे. पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असनू जखमी पतीला औरंगाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. काकडे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. (husband cut out his own throat due to clash with his wife husband hospitalized in aurangabad government hospital)
प्राप्त माहितीनुसार 33 वर्षीय भाऊसाहेब काकडे यांचा काही दिवासांपूर्वी 22 वर्षीय राणी यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीचे सहा महिने त्यांच्या संसार सुखात चालला. नंतर मात्र, छोट्या-छोट्या कारणांवरुन त्यांच्यात सारखे वाद होत होते. नेहमीच वाद होत असल्यामुळे भाऊसाहेब काकडे मानसिक तणावातून जात होते. शेवटी वादाला कंटाळून भाऊसाहेब आणि राणी या दाम्पत्याने घटस्फोट घेण्याचे ठरवले.
नियोजित वेळेनुसार सोमवारी दोघांनीही घटनस्फोट घेतला. मात्र, रितसर घटस्फोट झाल्यानंतरही यांच्यातील वाद कमी झाला नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरच या दोघांमध्ये वाद सुरु झाला. शेवटी मध्यरात्री बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भाऊसाहेब यांनी एका धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरून घेतला.
या घटनेत काकडे गंभीर जखमी झाले आहेत. भररात्री घटना घडल्यामुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. काकडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सोमवारपासून उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे. सततच्या भांडणामुळे पतीने स्वत:च आपला गळा कापून घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इतर बातम्या :
पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून संताप, कुऱ्हाडीने वार करुन पत्नीकडून हत्या
लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये प्रेयसी गर्भवती, प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवले
कधी नेता, कधी न्यायाधीश, कधी मोठा अधिकारी सांगून फसवणूक; कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
Health Tips: डोळे चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा!https://t.co/EtgeQDeoa4 | #HealthTips | #Eye | #Diet | #Healthcare | #Food | #Eyeproblems | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
(husband cut out his own throat due to clash with his wife husband hospitalized in aurangabad government hospital)