ज्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली, त्याच्याच सोबत विवाहितेचा प्रणय, अखेर एक दिवस असं घडलं की…

| Updated on: Mar 25, 2025 | 11:52 AM

Husband Caught Wife With Boyfriend : दोघे बेडरुममध्ये प्रणयामध्ये मग्न होते. दुपार झालेली, त्याचवेळी महिलेचा पती येऊन धडकला. त्याआधी महिलेने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली.

ज्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली, त्याच्याच सोबत विवाहितेचा प्रणय, अखेर एक दिवस असं घडलं की...
extramarital affair
Image Credit source: AI Genreated Image
Follow us on

मेरठच बहुचर्चित सौरभ सिंह हत्याकांड सध्या चर्चेत आहे. याच जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये अय्याशी करताना पकडलं. दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत बघून नवऱ्याचा संयम सुटला. त्याने जवळच असलेला दांडा उचलला आणि पत्नीच्या प्रियकराला असं धुतलं की, त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. त्याने पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगावर सर्वाधिक प्रहार केले.

हे प्रकरण नौचंदीच्या कैलाशपुरीच आहे. इथे एका विवाहित महिलेच परपुरुषासोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. एक दिवस प्रियकर घरात असताना महिलेचा पती तिथे आला. तिथे पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती इतका नाराज झाला की, त्याने तिच्या प्रियकराची धुलाई केली. त्याने त्याच्या गुप्तांगवर हल्ला करुन जखमी केलं. पोलीस ठाण्यात हा विषय पोहोचल्यानंतर जखमी युवकाच मेडीकल करण्यात आलं. पोलिसांनी सध्या महिलेच्या पती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस प्रकरणाच्या अन्य बाजूंची सुद्धा तपासणी करत आहेत.

प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार

महिला नौचंदी कैलाशपुरी वस्तीत पतीसोबत राहत होती. तिची मैत्री मुल्ताननगर भागात राहणाऱ्या युवकासोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही महिन्यापूर्वी महिलेच्या पतीला या बद्दल समजलं. त्यावरुन मोठा वाद झाला. पतीने दबाव टाकल्यानंतर महिलेने तिच्या प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर समेट झाला.

प्रणयामध्ये मग्न होते

रविवारी महिलेचा पती काही कामानिमित्त बाहेर गेला होता. याच दरम्यान तिने प्रियकराला घरी बोलवून घेतलं. दोघे बेडरुममध्ये प्रणयामध्ये मग्न होते. दुपार झालेली, त्याचवेळी महिलेचा पती येऊन धडकला. पत्नीला प्रियकरासोबत पाहून त्याची सटकली. पतीने युवकाला मारहाण सुरु केली. त्याच्या गुप्तांगावर प्रहार केले. या मारहाणीत युवक गंभीररित्या जखमी झाला.

महिलेच्या प्रियकरानेच पोलिसांना फोन केला

महिलेच्या प्रियकरानेच पोलिसांना फोन करुन या सगळ्याबद्दल कळवलं. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. जिल्हा रुग्णालयात मेडीकल केलं. मेडीकल आणि तक्रारीच्या आधारावर महिलेच्या पतीविरोधात मारहाण आणि धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या या प्रकरणात दोन्ही बाजू तडजोडीचा प्रयत्न करतायत.