ब्राझीलिया : सोशल मीडिया हे अभिव्यक्त व्हायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं चांगलं माध्यम आहे. सोशल मीडियामुळे जगभरात अनेक लोकं प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेक महिला, मुली सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र, काही महिलांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करणे त्यांच्या जोडीदाराला आवडत नाही. त्यातून दोघांमध्ये सतत वाद होतात. असाच काहीसा प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे, ज्यामध्ये पतीने वादात आपल्या पत्नीवर तब्बल 14 गोळ्या झाडून हत्या केली (husband killed his wife).
संबंधित महिलेचं नाव एलेन फेरेरा असं होतं. ती 35 वर्षांची होती. एलेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असे. ती तिचे व्हिडीओ टिकटॉक आणि इन्स्टाग्रावर शेअर करायची. मात्र, हीच गोष्ट तिचा पती एलेजांद्रो एंटोनियो एग्युलेरा याला पसंत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असायचे.
टिकटॉकवरील एका व्हिडीओमुळे एंटोनिया आणि फेरेरा या दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. रागाच्या भरात एंटोनियो याने स्वत:च्या पत्नीवर एकामागे एक अशा एकूण 14 बंदूकीच्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:च्या डोक्यात एक गोळी झाडून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार घडत असताना त्यांच्या सहा वर्षाची मुलगी त्यांच्यासमोर उपस्थित होती. आता या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाम्पत्यच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन वाद सुरु असायचा. फेरेराला टिकटॉकवर जवळपास 58 हजार फोलोअर्स होते. ती सतत बोल्ड आउटफिट्सचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. तेच तिच्या पतीला मान्य नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. आता याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत (husband killed his wife).
हेही वाचा : उस्मानाबाद हारदलं! शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीला बळजबरी घरातून उचलून सामूहिक बलात्कार