Crime News : घरात कधी कोणती गोष्ट नसली तर आपण साहजिक लगेचच शेजाऱ्याकडे ती वस्तू मागण्यासाठी जातो. शेजाऱ्यासोबत अनेकांचे घरगुती संबंध असतात. पण रायगढमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागितल्याने पतीने चक्क पत्नीला मारहाण करत तिची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पत्नीची हत्या केल्याने पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना छत्तीसगड जिल्ह्यातील भेडीमुडा गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 50 वर्षाच्या भगत राम अगरिया याने दांड्याने पत्नीला मारहाण करुन तिचा जीव घेतला. कारण त्याने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागण्यास मनाई केली होती. तरी देखील पत्नी शेजाऱ्याकडे टोमॅटो मागण्यासाठी जात असल्याने पतीने हे धक्कादायक पाऊल उचललं.पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु केली आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पती फरार होता. पण पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपीचे वडील यांनी जबाबात सांगितले की, सून टोमॅटो मागण्यासाठी शेजाऱ्याकडे जात होती. मुलाने मनाई केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने बाहेरून काठी आणून सूनेला मारहाण केली. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने सूनेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस चौकशी करुन पुढील कारवाई करत आहेत.