इटावा : उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रजनीश असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. या दाम्पत्याला एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. रजनीश हा शेती व्यवसाय करत होता. शेतीसाठी त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्ज कसे फेडायचे या चिंतेत तो होता. मात्र रजनीश हा व्यसनांच्या आहारी गेला होता, असा आरोप त्याच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री रजनीशची पत्नी कांचन हीने आपल्याला बहिणीच्या घरी जायचे आहे, असा हटट् पतीकडे धरला. मात्र रजनीशने आपल्या पत्नीला बहिणीकडे जाऊ नको असे सांगितले. त्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन, घरातून बाहेर पडला. जेव्हा तो रात्री घरी आला तेव्हा पुन्हा त्याच्या पत्नीने आपल्याला बहिणीकडे जायचे आहे, असे त्याला सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. राग अनावर झाल्याने त्याने पत्नीची हत्या केली, व स्वत: विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
घटनेबाबत बोलताना रजनीशचा मोठा भाऊ अवनिश याने सांगितले की, जेव्हा रात्री ते रजनीशच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तर रजनीशची प्रकृती अत्यावस्थ होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.
Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या