प्रशिक्षणार्थी आयएएस रद्द झालेली उमेदवार पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहेत. नवी दिल्लीतील न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळ्यानंतर पूजा खेडकर दुबईत पळल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरसंदर्भात तीन ठिकाणांवरुन माहिती मागवली आहे. महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमी यांच्याकडून माहिती मागवली आहे. पूजा खेडकर सध्या कुठे आहे? त्याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी पूजा खेडकर दुबईत पळून गेल्याचा दावा खोडून काढला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच आहे.
पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सध्या होत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर अटक होण्याच्या भीतीने भारतातून पूजा खेडकर पळल्याच्या बातम्या आल्या. त्यावर पोलिसांनी माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार पूजा खेडकर ही भारतातच आहे. तिच्याबाबत दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी सेंटरकडून माहिती मागितली आहे.
पूजाने सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती दिल्ली पोलिसांनी मागवली आहे. सगळी कागदपत्रे पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस पूजाला चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पूजा खेडकर प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुण्यातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलवर (YCM) आरोप केले आहेत. पूजा खेडकरला थेट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले. इतरांना वेटींग करावी लागते. पूजा खेडकरासाठी वेटींग लिस्ट नाही. ती अपंग नसताना फेक दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले. हे चुकून झालेलं नाही. संबंधित YCM च्या यंत्रणेने त्यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. पूजा खे़डकरचे रेशन कार्ड, आधारकार्ड पाहिले होते का? ycm ला केवळ पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना दिव्यांग प्रमाण पत्र देण्याचा अधिकार आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड यावर पत्ता वेगवेगळा आहे. एमआरआय हा खासगी डॉक्टरचा वापरण्यात आला. तो ही कागदपत्रांसोबत जोडलेला नाही. एमआरआय नसताना त्यांना दिव्यांग प्रमाण पत्र देण्यात आलं? असे प्रश्न विजय कुंभार यांनी विचारले आहे.
हे ही वाचा
एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली