‘आधी मला वापरलं आणि आता…’, IIT च्या विद्यार्थिनीचा ACP मोहसीन खानवर बलात्काराचा आरोप

| Updated on: Dec 13, 2024 | 12:33 PM

IIT ही देशातील एक उच्चशिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने थेट ACP दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात आरोपी आणि पीडित दोघेही उच्चशिक्षित आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे?.

आधी मला वापरलं आणि आता..., IIT च्या विद्यार्थिनीचा ACP मोहसीन खानवर बलात्काराचा आरोप
ACP Mohsin khan
Follow us on

IIT च्या एका विद्यार्थिनीने ACP मोहसीन खान यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या आरोपानंतर अधिकाऱ्यांनी ACP वर FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून चार्ज म्हणजे जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष SIT ची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी मोहसीन खान उत्तर प्रदेश कानपूरमध्ये तैनात होते. या प्रकरणात काही नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी हे प्रकरण सार्वजनिक झालं. याआधी एसीपी मोहसीन खान आणि विद्यार्थिनीमध्ये तडजोड करण्याविषयी बोलणी सुरु होती. सर्वकाही व्यवस्थित चाललेलं. एसीपीला क्लीनचिट सुद्धा मिळालेली. पण ACP च्या एका स्टेटमेंटने पीडित मुलगी संतापली.

कानपूर IIT मध्ये ACP मोहसीन खान सायबर क्राइम आणि क्रिमिनोलॉजीच अभ्यास करत होते. त्यावेळी त्यांची विद्यार्थिनी बरोबर ओळख झाली. ACP ने प्रेमाच्या जाळ्यात फसवून आपल्यावर बलात्कार केला, असा विद्यार्थिनीचा आरोप आहे. ACP मोहसीन खान आधीपासून विवाहित होते. हे सत्य समजल्यानंतर पीडित मुलीने कानपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस कमिश्नरच्या आदेशावरुन डीसीपी अंकिता शर्मा आणि एसीपी अर्चना सिंह साध्या सिविल ड्रेसमध्ये आयआयटीमध्ये पोहोचल्या. दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा आरोपात तथ्य आढळून आलं. पोलीस कमिश्नर अखिल कुमार यांनी ACP विरोधात बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली रिपोर्ट नोंदवण्याचे आदेश दिलेत.

अधिकाऱ्याची पत्नी गर्भवती असल्याच समजल्यानंतर ती…

ACP मोहसीन खान यांच्यावर आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अधिकाऱ्याची पत्नी गर्भवती असल्याच समजल्यानंतर ती आतमधून कोलमडली. पण मग तिने आपल्या नशिबाशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतला. फक्त तिने एक अट ठेवली, ACP च पोस्टिंग दुसऱ्या शहरात करावं. याचा निर्णय सुद्धा झाला होता. प्रकरण मिटणार होतं. त्यावेळी बड्या अधिकाऱ्यांसमोर ACP ने विद्यार्थिनीला सायको म्हटलं. तिच्यावर मनोरुग्णांच्या डॉक्टरकडून उपचार सुरु असल्याच सांगितलं.

तिने अन्य काय मागण्या केल्या?

त्यामुळे विद्यार्थिनी भडकली. तिने कुठलीही तडजोड करण्यास नकार दिला. पीडितेने म्हटलं, पहिल म्हणजे माझा वापर केला आणि आता मला सायको म्हणतो. त्यानंतर विद्यार्थिनी एफआयआर नोंदवण्यावर अडून बसली. एफआयआरशिवाय पीडितेने काही अन्य मागण्यासुद्धा ठेवल्या. यात तिची सुरक्षा, निष्पक्ष तपास, आरोपीच्या सहकाऱ्यांना आयआयटी प्रवेशावर मनाई आणि तिची ओळख गोपनीय ठेवण्याची मागणी केली आहे.