Thane : लोकलच्या गर्दीत चोरट्याची हातसफाई, आठवड्याभरातच वर्माला मिळाली कर्माची फळे..!

| Updated on: Jul 29, 2022 | 1:01 PM

लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांची अधिकची गर्दी होते. याच दरम्यानच्या काळात अनिलकुमार वर्मा हे हात चलाखी करीत मोबईल लंपास करीत होते. यामध्ये तो एवढा तरबेज झाला होता की गर्दी असतानाही कुणाच्याही निदर्शनास येत नव्हते. त्याने आठ दिवसांच्या काळात तब्बल 16 मोबाईल प्रवाशांच्या खिशातून चोरले होते.

Thane : लोकलच्या गर्दीत चोरट्याची हातसफाई, आठवड्याभरातच वर्माला मिळाली कर्माची फळे..!
लोकलमध्ये मोबाईल चोरी करणारा चोर अखेर पोलिसांनी जेरबंद केला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

ठाणे : (Local Railway) लोकलमधील गर्दीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडतात. गर्दीचा फायदा घेऊन काही चोर (Mobile theft) मोबाईल लंपास करतात. मात्र, गेल्या एका आठवड्यात 16 महागडे मोबाईल चोरीला गेल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. आठ दिवसापासून (Police) पोलीस या चोरट्याच्य माघावर होते. अखेर (Kalyan) कल्याण लोहमार्गाच्या पोलिसांनी चोरट्याला पकडले असून गेल्या आठ दिवसांमध्ये आपण 16 मोबाईल चोरले असल्याचे त्यांने कबुलही केले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशी देखील त्रस्त झाले होते. अखेर चोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हात चलाखी अन् मोबाईल लंपास

लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांची अधिकची गर्दी होते. याच दरम्यानच्या काळात अनिलकुमार वर्मा हे हात चलाखी करीत मोबईल लंपास करीत होते. यामध्ये तो एवढा तरबेज झाला होता की गर्दी असतानाही कुणाच्याही निदर्शनास येत नव्हते. त्याने आठ दिवसांच्या काळात तब्बल 16 मोबाईल प्रवाशांच्या खिशातून चोरले होते. मोबाईल चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण स्टेशन परिसरात संशयीत मिळून आला. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला खाकीचा हिसका दाखवताच त्याने हा गुन्हा कबुल केला आहे.

वर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी

ठाणे परिसरातील लोकलमध्ये मोबाईलची चोरी करणारा अतुलकुमार वर्मा हा मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. त्यांने गेल्या आठ दिवसांमध्ये 80 हजराचे मोबाईल चोरल आहेत. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि चोरीच्या घटना यामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. मात्र, दुसऱ्या मोबाईल चोरीच्या घटनेचा तपास करीत असताना वर्मा याचे कर्म पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

प्रवाशांना मिळणार मोबाईल

ज्या प्रवाशांच्या मोबाईलची चोरी झाली अशांना हे मोबाईल परत केले जाणार आहेत. पोलीस ठाण्यात जशा तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यानुसार मोबाईल हे वापस दिले जाणार आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये वर्मा याने केलेल्या कर्माची फळे त्याला मिळाली असून पोलिसांनी त्याला कल्याण स्टेशन परिसरातूनच ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर वर्मावर आणखी किती गुन्हे आहे याचा तपास केला जात आहे.