मुंबई : बिहार (Bihar) येथे एक धक्क्दायक घटना घडलीयं. एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अपहरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. बगमारा येथील अपग्रेडेड मिडल स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक (Headmaster) उपेंद्र प्रसाद सिंह यांचे अपहरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवघरमधील जासीडीह येथे राहणारा उपेंद्र प्रसाद सिंह शुक्रवारी शाळेतून (School) घरी जात असताना बेपत्ता झाले. याप्रकरणी मुख्याध्यापकाची सुटका करण्यासाठी कुटुंबाकडून 15 लाखांची खंडणी मागितल्याची माहिती मिळते आहे. आता या प्रकरणाची जमुई पोलिस तपास करत आहेत.
बांका जिल्ह्यातील बेल्हार भागातील रहिवासी असलेले 45 वर्षीय उपेंद्र प्रसाद सिंह हे देवघरच्या जसिडीह येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते दररोज त्यांच्या बाईकवरून येथील अपग्रेडेड मिडल स्कूल बागमारा येथे येत असत. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या कार्यालयीन कामासाठी शाळेतून निघाले होते. तेथून त्यांना घरी जायचे होते.
शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते जसिडीह येथील त्यांच्या घरी पोहोचले नव्हते. प्रभारी मुख्याध्यापक उपेंद्र कुमार सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची दुचाकी माहिती मिळाली नाहीयं. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा उपेंद्र कुमार यांच्या मोबाईलवरून कुटुंबियांना फोन आला. त्यावेळी उपेंद्र यांचे अपहर झाल्याचे फोनवरून सांगण्यात आले. यावेळी 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
अपहरण आणि खंडणीच्या मागणीनंतर कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर जमुई जिल्ह्याच्या पोलिस पथकाने तपास सुरू केला आहे. मुख्यालयाचे डीएसपी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, माध्यमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाच्या बेपत्ता आणि अपहरणानंतर खंडणीची तक्रार करण्यात आली आहे, त्या आधारावर पोलिसांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे.