दोन लाखांचं मांडूळ कशासाठी आणलं? सौदा फिस्कटला आणि धाड धाड गोळीबार झाला, काय घडलं मालेगावात

| Updated on: Mar 16, 2023 | 4:03 PM

नाशिकच्या मालेगाव येथे तब्बल दोन लाख रुपयांचे मांडूळ विक्रीचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोन लाखांचं मांडूळ कशासाठी आणलं? सौदा फिस्कटला आणि धाड धाड गोळीबार झाला, काय घडलं मालेगावात
Image Credit source: Google
Follow us on

मालेगाव, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जादू टोण्याच्या संदर्भात पोलिसांकडून कारवाई कारवाई केली जात आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी जादू टोण्यासाठी पशू – पक्षी विक्री प्रकरणी पोलिस कारवाई करत आहे. त्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे काही विशिष्ट प्रजातीच्या पशू-पक्षांना मोठी मागणी आहे. वाट्टेल ती किंमत द्यायला अनेक जण तयार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच एक मालेगाव तालुक्यातील झोडगे शिवारात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मांडूळ विक्रीचा सौदा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर गोळीबाराच्यानंतर त्यापाठीमागील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मालेगाव येथील झोडगे शिवारात मांडूळ विक्रीचा सौदा सुरू होता. दोन लाख रुपयांना हे मांडूळ विक्री केले जाणार होते. मात्र सौदा अचानक फिस्कटला आणि गोळीबार करत मांडूळ घेऊन पोबारा केल्याची बाब समोर आली आहे.

मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यामध्ये धुळे येथील संशयित प्रमोद अहिरे, रामभाऊ, शोएब, सिराज बशीर, इम्रान खान आणि बशीर शेख यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये तब्बल दोन लाख रुपयांचे मांडूळ विक्रीसाठी कुठून आणले होते? मांडूळ कशासाठी खरेदी केले जाणार होते? यामागे काही रॅकेट आहे का ? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.

मालेगाव पोलिसांत तक्रार देणारे उमेश मधुकर जाधव यांनी तक्रार दिली होती. त्यावरून विश्वास संपादन करून संशयित आरोपींनी जाधव यांना बोलावून घेतले होते. व्यवहार केला जात असतांना अचानक गोळीबार करत मांडूळ घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे.

यामध्ये मांडूळाचि किंमत दोन लाख रुपये असून त्याच्या सोबत एक मोबाईलही चोरून नेला आहे. त्यावरून मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलिस उप निरीक्षक स्वप्नील कोळी हे करीत आहे.