वाडा / शशिकांत कासार : पालघर जिल्ह्यातील वाडा पश्चिम वनविभागाचे परिक्षेत्र अधिकाऱ्याला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(Palghar Bribery Prevention Department)ने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. हिंमत सापळे(Himmat Saple) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. वाडा शहरातील एका व्यक्तीकडे जमिनीच्या प्रकरणात या अधिकाऱ्याने पैशांचा तगादा लावला होता. त्यानुसार लाचेची ही रक्कम स्वीकारताना सापळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. (In Palghar, a forest department ranger was caught red-handed taking a bribe)
हिंमत सापळे वन विभागाच्या वाडा ( पश्चिम) क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. वाडा शहरातील एका व्यक्तीने जमिनीस वन कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याबाबतचा दाखला मिळवण्यासाठी सन 2017 मध्ये अर्ज केला होता. सदर अर्ज अद्याप प्रलंबित होता. सदर अर्जाचा पाठपुरावा केला असता सदर अर्ज पुढे पाठविण्यासाठी सापळे यांनी त्यांच्याकडे 60 हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम घेण्यासाठी सापळे हे तक्रारदार व्यक्तीच्या खाजगी कार्यालयात गेले असता पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी 50 हजारांची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
दरम्यान, कोल्हापूरमध्येही आज लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. एलसीबीच्या दोन कॉन्स्टेबलला लाचलुचपत विभागाने 10 लाखांची लाच घेताना अटक केली आहे. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी अटक करण्यात आलेल्या कान्स्टेबलची नावे आहेत. कारंडे आणि गावडे यांनी एकूण 25 लाखांची मागणी केली होती. यापैकी 10 लाख रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. (In Palghar, a forest department ranger was caught red-handed taking a bribe)
इतर बातम्या
Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
Pune Crime : शिरुरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल