संदीप शिंदे, टीव्ही 9 मराठी, माढा ( सोलापूर ) : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ वरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. गौतमी पाटील ( Gautami Patil Viral Video ) हीचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतांनाचा व्हीडिओ सोशल मीडियावर ( Gatutami Patil Social Media ) तूफान व्हायरल झाला आहे. यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अशातच गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ घुंगरू चित्रपटाची टीम रस्त्यावर उतरणार आहे. आरोपीला अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घुंगरू चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांनी गौतमी पाटील हिच्या समर्थनार्थ उतरणाऱ्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये गौतमी पाटीलचा असा व्हिडीओ काढणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे.
मी दररोज गौतमीला सावरतो आहे. मात्र या गोष्टीमुळे ती फारच हताश झालीय. व्हिडिओ काढणाऱ्यांसह शेअर करणाऱ्या सर्व संबधितावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी आरोपी पर्यत पोहचुन येत्या दोन दिवसांत अटक करावी अन्यथा राज्यभरात घुंगरु चित्रपटाचे कलाकार, दिगदर्शक सर्वच टिम रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा चित्रपटाचे निर्माते बाबासाहेब गायकवाड यांनी tv9 मराठी शी बोलताना दिला आहे.
घुंगरु चित्रपटाच्या माध्यमातुन गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. मुख्य भुमिका गौतमी पाटीलची या चित्रपटात आहे. मात्र गेल्या तिन दिवसांपासुन तिचा चेंजिंग रुम मधला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली तरी अद्याप पोलिंसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. या प्रकारामुळे ती घुगरु चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील आलेली नसल्याने कलाकार निर्माते, दिग्दर्शकांना देखील तिची उणीव भासत आहे.
लोककलावंताच्या आयुष्याचे चित्रण घुंगरु या चित्रपटात मांडले असुन या चित्रपटात मुख्य अभिनय गौतमीचा असुन तिच्या अखेरच्या लावणीचे चित्रीकरण अद्याप राहिले आहे. त्यामुळे गौतमी पाटीलसाठी घुंगरू चित्रपटाची टीम आंदोलनाच्या तयारीत आहे.
गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये नेटकऱ्यांनी गौतमी पाटीलच्या व्हिडिओवरुण संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती कोण आहे याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.