मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी सबिनाला नवरा-बायकोने घरी बोलावलं आणि मग तिच्यावर…..

| Updated on: Jun 22, 2023 | 8:34 AM

महत्वाच म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी होता फक्त संशय. या बर्थ डे पार्टीमध्ये त्यावेळी तिथे जे घडलं, ते खूपच धक्कादायक होतं. सबिना मोठ्या विश्वासाने त्यांच्या घरी गेली होती.

मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी सबिनाला नवरा-बायकोने घरी बोलावलं आणि मग तिच्यावर.....
The murder took place in the house of a couple who were celebrating their son's birthday.
Follow us on

गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सबिना नावाची एक महिला मोठ्या विश्वासाने आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. रमेश (40) आणि त्याची पत्नी हीनाने सबिनाला मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी म्हणून घरी निमंत्रित केलं होतं. आपण ज्या घरात बर्थ डे पार्टीसाठी चाललोय, तिथे असं काही होईल, याची सबिनाने कल्पना पण केली नव्हती. पण त्या बर्थ डे पार्टीमध्ये अशी एक घटना घडली, ज्यामुळे सबिनाला आपण प्राण गमवावे लागले.

महत्वाच म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी होता फक्त संशय. या संशयापोटी सबिनाला आपले प्राण गमवावे लागले. या बर्थ डे पार्टीमध्ये त्यावेळी तिथे जे घडलं, ते खूपच धक्कादायक होतं.

सगळं घडलं फक्त संशयातून

4 लाख रुपयांचे दागिने आणि कॅश चोरीच्या प्रकरणातून हे सर्व घडलं. घरात बर्थ डे पार्टी सुरु असताना, 4 लाख रुपयांचे दागिने चोरी झाल्याचा आरोप रमेश आणि त्याची पत्नी हिनाने केला. रमेशन आधी पत्नी हिनावर संशय घेतला व तिचा छळ केला. त्यानंतर त्याने सबिनावर संशय व्यक्त केला. नवरा-बायको दोघांनी सबिनावर चोरीचा आळ घातला.

पाईपने मारहाण

रमेश, हिना आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून सबिनाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. चोरीचा गुन्हा मान्य करावा, यासाठी तिच्या शरीरावर जखमा केल्या. सबिनासोबत आलेल्या चुलत बहिणीला तसेच गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा मारहाण केली.

मोठ्या आवाजात म्युझिक

चोरीच्या संशयातून नातेवाईकांनी 22 वर्षाच्या सबिनाला मरेपर्यंत मारहाण केली. सबिनाला मारहाण सुरु असताना तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं.

पोलिसांना कसं कळलं?

मारहाणीत सबिनाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं. नंतर म्युझिकमुळे आवाज होत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तिथे दाखल झाल्यानंतर पोलिसांना सबिनाचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सबिनाची चुलत बहिण आणि ड्रायव्हरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलय.

किती जणांना ताब्यात घेतलय

सबिनाच्या बहिणीच्या तक्रारीवरुन गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलीय, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रवी कुमार यांनी दिली.