कराची : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला फूड पॉयजनिंग झालय. त्याच्यावर विष प्रयोग झाल्याच, त्याला रुग्णालयात दाखल केल्याच बोलल जात होतं. पण यापैकी काहीही झालेलं नाहीय. आता असं म्हटल जातय की, त्याला 102 डिग्री ताप होता. अनेकवेळा उल्ट्या झाल्या. सुरक्षा कारणांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. उपचारांसाठी डॉक्टरांच्या टीमलाच घरी बोलवण्यात आलं. दाऊद इब्राहिम कराची स्थित आपल्या बंगल्यात असल्याच बोलल जातय. बंगल्यातील पहिला मजला वॉर्डरुममध्ये बदलण्यात आला आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाऊदवर उपचार सुरु आहेत. मागच्या आठवड्यात सोमवारी दाऊदला अनेकदा उल्टी झाली. 102 डिग्री ताप होता. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमला क्लिफ्टन कराची येथील निवासस्थानी बोलवण्यात आलं. 68 वर्षाच्या दाऊदला कराची येथील बंगल्यात तीन-चार बॉटल ड्रीप देण्यात आलं.
तीन दिवसाच्या उपचारानंतर दाऊदच्या तब्येतीत सुधारणा झाल्याच म्हटलं जातय. पण सध्या तो आराम करतोय. सततच्या उल्ट्यांमुळे दाऊद दुबळा झालाय. बेडवरुन उठण्याच्या स्थितीमध्ये नाहीय. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सतत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दाऊद अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीय. दाऊदच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीतील घरात दाऊद भोवती 5 ते 6 सुरक्षा लेयर आहेत. त्याला विष देण किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण शक्य नाहीय. D गँगशी संबंधित सूत्रांनी माहिती दिली.
मुंबई पोलिसांच्या सोर्सेसनी काय सांगितलं?
त्यांच्या मते दाऊदला फूड पॉयजनिंग झालय. त्यामुळे त्याला सतत उल्ट्या आणि ताप येतोय. D कंपनीच्या टॉप सोर्सेजनुसार दुपारी 3-4 वाजेपर्यंत या बद्दलची स्थिती अजून स्पष्ट होईल. मुंबई पोलिसांच्या सोर्सेजनी सुद्धा हेच सांगितलं की, विष प्रयोगाबद्दल कुठलही कन्फर्मेशन नाहीय. मुंबई ATS क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. D कंपनीच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.
या महिन्यात दाऊदचा वाढदिवस कधी?
रविवारी रात्री भारतीय मीडियामध्ये दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याची बातमी आली. रुग्णालयात तो शेवटच्या घटका मोजत असल्याच सांगण्यात आलं. पण या वृत्ताला कुठलाही अधिकृत दुजोरा नाहीय. भारतीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलीस सुद्धा या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे, ते जाणून घेण्याच्या मागे लागले आहेत. या महिन्यात 27 डिसेंबरला दाऊदचा वाढदिवस आहे. त्यासाठी कराचीत अज्ज्ञात ठिकाणी काही खास पाहुण्यांना पार्टीच निमंत्रण देण्यात आलं आहे.