TCS कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असणाऱ्या सुरभी जैनने दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं. आता या प्रकरणात सोसायटीच्या सिक्योरिटी गार्डने काही खुलासे केले आहेत. गार्डने सांगितलं की, सुरभी जीवन संपवण्याच्या दोन तास आधी फिरत होती. या दरम्यान ती गार्डशी सुद्धा बोलली. सुरभीला पाहून अजिबात असं वाटलं नाही की, ती टेन्शनमध्ये आहे, असं गार्डने सांगितलं. ती माझ्याशी चांगलं हसून बोलली असं गार्डच म्हणण आहे. त्यानंतर समजलं की, सुरभीने जीवन संपवलं. मी स्वत: हैराण आहे. जी मुलगी काही वेळापूर्वी माझ्याशी हसून बोलली. तिने थोड्याचवेळात जीवन संपवलं. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली.
सुरभी सोसायटीत फिरत असताना CCTV कॅमेऱ्यात दिसली. गार्डशी बोलताना दिसतेय. गार्डने सांगतिलं की, सुरभी आली, तेव्हा मीच ड्युटीवर होतो. याआधी तिला कधी इथे पाहिलं नव्हतं. सुरभीने गार्डला सांगितलं की, ती इथे बी ब्लॉकमधील फ्लॅट नंबर 704 पाहायला आली आहे. ब्रोकर येईल तेव्हा जाईन. तिला एंट्री करायला सांगितली, तेव्हा तिने ब्रोकर आल्यावर करेन असं उत्तर दिलं. गार्ड म्हणाला की, मी तिला सांगितलं की, एंट्री केल्याशिवाय वरती जायला मनाई आहे. त्यावर ती म्हणाली की, मी वरती जाणार नाही. खालीच फिरतेय. 24 जूनच्या दुपारी 12.30 मिनिटांनी ती आली होती. दुपारी 2.30 वाजेपर्यंत एकटीच खाली फिरत होती. तो पर्यंत ब्रोकर आला नव्हता.
‘त्यानंतर काय झालं मला माहित नाही’
आधी ती ए ब्लॉकमध्ये गेली नंतर बी ब्लॉकमध्ये. दोन्ही ठिकाणी गार्ड होते. त्यानंतर ती सी ब्लॉकमध्ये गेली. तिथे गार्ड नव्हता. पावणे तीनच्या सुमारास ती इथून लिफ्टने वर गेली. त्यानंतर काय झालं मला माहित नाही असं गार्ड म्हणाला. मी मागच्या बाजूला ड्युटीवर होतो. वरती गेल्यानंतर तिने तिथून उडी मारली. झाडलोट करणाऱ्या बाईने या घटनेबद्दल माहिती दिली.
I am Sorry pappa
सुरभीच्या वडिलांनी सांगितलं की, तिचं 9 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण काही काळाने तिचा घटस्फोट झाला. काही काळापासून ती डिप्रेशनमध्ये होती. अहमदाबादमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मृत्यूआधी तिने I am Sorry pappa म्हणून तिने मला मेसेज केला. त्यानंतर आम्हाला समजलं की सुरभीने जीवन संपवून घेतलय.