आयफोन ठरला हत्येचं कारण, मृतदेह शेतात फेकला, पोलिसांनी कसा शोधला?

| Updated on: Nov 02, 2021 | 1:05 PM

थॉमस नावाचा तरुण आयफोन विकण्यासाठी गेला होता. मात्र आयफोन पाहून तो विकत घेण्यासाठी आलेल्या आरोपीची मती भ्रष्ट झाली. पैसे देण्याऐवजी त्याने थॉमसची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला

आयफोन ठरला हत्येचं कारण, मृतदेह शेतात फेकला, पोलिसांनी कसा शोधला?
crime
Follow us on

चंदिगढ : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील गुजरपुरा गावात रविवारी झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. आयफोन हत्येचं कारण ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. हत्येनंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह शेतात फेकून दिला होता.

काय आहे प्रकरण?

या हत्येचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. थॉमस नावाचा तरुण आयफोन विकण्यासाठी गेला होता. मात्र आयफोन पाहून तो विकत घेण्यासाठी आलेल्या आरोपीची मती भ्रष्ट झाली. पैसे देण्याऐवजी त्याने थॉमसची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

अमृतसरच्या अजनाला येथे राहणाऱ्या थॉमसच्या हत्येचे गूढ उकलत पोलिसांनी सनी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या हत्येमागे मृत थॉमसचा महागडा आयफोन असल्याचे तपासात समोर आले आहे. मोबाईल विकण्यासाठी थॉमस घराबाहेर पडला होता आणि आरोपी सनीला भेटला होता. सनीने आयफोनचा व्यवहार केला, मात्र पैसे देताना त्याचा हेतू बदलला. त्याने थॉमसची हत्या करून त्याचा मृतदेह शेतात फेकून दिला.

डीएसपी जसवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आयफोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. या खुनात आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यालाही अटक करण्यात येईल.

संबंधित बातम्या :

‘बाळांनो, व्हिडीओ ऑन करा’ विद्यार्थ्यांना डोळे भरुन पाहिलं, ऑनलाईन लेक्चर संपताच शिक्षिकेचा अंत

CCTV VIDEO | खड्ड्यात आदळून दुचाकी घसरली, बसखाली चिरडून 32 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी, नाशकात दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक