संध्याकाळी परत येते म्हणून निघाली, तीन दिवस बेपत्ता, अखेर प्रसिद्ध मॉडल लिव्ह इन पार्टनरसोबत ‘त्या’ रुममध्ये…

| Updated on: Jul 27, 2024 | 8:15 PM

बिकानेरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध मॉडलचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्यासोबत तिचा लिव्ह इन पार्टनर बेशुद्धावस्थेत सापडला आहे. इशप्रीत असं या मॉडेलचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 8 लाख फॉलोअर्स आहेत. इशप्रीत अत्यंत फेमस होती. पण मग तिने असं टोकाचं पाऊल का उचललं? की तिची हत्या करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

संध्याकाळी परत येते म्हणून निघाली, तीन दिवस बेपत्ता, अखेर प्रसिद्ध मॉडल लिव्ह इन पार्टनरसोबत त्या रुममध्ये...
Ishpreet Kaur
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मैत्रीणीकडे जाते म्हणून ती घरातून निघाली… रात्री एक फोन आला, ती इथेच मुक्काम करणार आहे… त्यानंतर तीन दिवस ती बेपत्ता झाली… घरच्यांनी अधिक शोधाशोध केली तेव्हा एका रुममध्ये प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर इशप्रीत कौर हिचा मृतदेह पंख्याला लटकलेला मिळाला. तिचा लिव्ह इन पार्टनर त्याच रुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळावरून एक पिस्तुलही ताब्यात घेण्यात आलं आहे. मॉडेलच्या वडिलांनी या तरुणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर विवाह करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेची आहे.

बिकानेरमध्ये हे प्रकरण घडलंय. आपल्या मुलीचा मृतदेह पाहून गुरदीप सिंग चांगलेच संतापले आहेत. जयराजने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इशप्रीत कौर ही प्रसिद्ध मॉडल होती. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 8 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर जयराज हा व्याजाने पैसे देण्याचं काम करत होता.

खबर मिळाली अन्…

मुक्ता प्रसाद परिसरातील बीकाजी सर्कलजवळील जयराज तंवरच्या घरात ही घटना घडली आहे. इशप्रीत कौर अशी या मृत तरुणीची ओळख पटली आहे. ती 26 वर्षाची आहे. ती खतुरिया कॉलोनीतील मन मंदिराजवळ राहायची. शुक्रवारी रात्री 9 वाजता बीकाजी सर्कलच्या कानासरजवळच्या एका रुममध्ये एक तरुण आणि तरुणी संदिग्ध अवस्थेत पडल्याची खबर मिळाली होती, त्यानुसार आम्ही घटनास्थळी आल्यावर हा प्रकार उघड झाल्याचं पोलीस अधिकारी धीरेंद्र सिंह यांनी सांगितलं.

तीन दिवसांपासून बेपत्ता

धीरेंद्र सिंह यांच्या सांगण्यानुसार, इशप्रीत 25 जुलैपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्याच दिवशी हे दोघे या घरात आले होते. शुक्रवारी रात्री इशप्रीतचे घरचे तिला शोधत जयराज तंवर याच्या घरी आले. घराचा एक दरवाजा वगळता सर्व दरवाजे बंद होते. आत डोकावून पाहिल्यावर इशप्रीतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांना तात्काळ कळवलं. पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा इशप्रीत लटकलेल्या अवस्थेत होती. तिचा पाय वाकडा झाला होता.

जवळच जयराज बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांना वाटले तोही मेलेला आहे. पण त्याचं पोट हालताना पाहून पोलिसांनी त्याला उठवलं. तो लगेच उभा राहिला. घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तुल सापडलं आहे. पण त्यातून गोळी चालवली गेली नव्हती. पण गोळी चालवण्याचा युवकाचा बेत असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

काळजाचा ठोकाच चुकला

मैत्रीण पूनमच्या घरी जात आहे, असं सांगून ती घरातून निघाली होती. त्यानंतर इशप्रीतच्या घरी फोन आला. रात्री ती इकडेच थांबणार असल्याचं सांगितलं गेलं. दुसऱ्या दिवशी इशप्रीत घरी आली नाही. त्यामुळे तिला घरच्यांनी फोन केला. पण तिने फोन घेतला नाही. त्यानंतर तिचा मोबाईल फोन बंद आला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेत ते जयरामच्या घरी आले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

चार आयफोन सापडले

पोलिसांना घरात पिस्तुल सापडले. त्यानंतर पोलिसांनी या घराची झडती घेतली असता त्यांना चार महागडे आयफोन सापडले. या फोनवरून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. तसेच जयराजचं स्टेटमेंट घेतलं जाणार आहे. त्यातूनच ही हत्या होती की आत्महत्या याची माहिती मिळू शकणार आहे.