बस चालवतानाच ड्रायव्हरला आला अटॅक, सिग्नलवर थांबलेल्या सगळ्यानाच मग…(Video)

| Updated on: Dec 03, 2022 | 12:46 AM

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना चिरडत बस पुढे जात असल्याचे दिसत आहेत.

बस चालवतानाच ड्रायव्हरला आला अटॅक, सिग्नलवर थांबलेल्या सगळ्यानाच मग...(Video)
Follow us on

जबलपूरः मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये भयंकर अपघात झाला. जबलपूरमध्ये एक मेट्रो बसने रिक्षा, दुचाकी आणि स्कुटी चालवणाऱ्यांना चिरडतच पुढे निघून गेली. या अपघातात बसचा चालक हरदेव पाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर या अपघातात एक ज्येष्ठ नागरिकही गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पाच जणाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

चालकाला हृदयविकाराच झटका आल्याने हा अपघात झाला असून त्यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांना बसने चिरडले आहे.

ही भयंकर दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, ही बस आधारताळ ते राणीताळकडे जात होती. यावेळी बस दमोह नाक्याजवळ आली असतानाच या बसचा अपघात झाला. अपघात घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या बसचा अपघात झाल्यानंतर बसचा चालकही त्याच्याच जागेवर तो जखमी अवस्थेत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी चालकाला मृत घोषित केले.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना चिरडत बस पुढे जात असल्याचे दिसत आहेत. यामध्ये वाहनधारकही चिरडल्याचे दिसून येत आहे.

या अपघातात ठारे झालेली एक व्यक्ती ही ट्रान्सपोर्ट कंपनीची मालक होती. ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते.

त्यावेळी ते सिग्नलवर थांबलेले असतानाच मागून बस आली आणि त्यांना बसखाली चिरडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.