किशोर पाटील, जळगाव | पोलिसांवर राज्याच्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी असते. परंतु जनतेची सुरक्षा करणारे पोलीसच बिअरबारमध्ये दारु पिऊन हाणामारी करणार असेल तर…हे दृश्य महाराष्ट्र पोलीस दलातील आहे. अगदी गणवेशात बसून पोलिसांनी बारमध्ये मद्यपान केला. त्यानंतर बारबाहेर येऊन हाणामारीसुद्धा केली. समस्त जनता हा प्रकार पाहत होती. तसेच सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार बंदीस्त झाला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात जुगारचा डाव रंगल्याची बातमी आली होती. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील पोलीस जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. त्यानंतर जळगावात दोन पोलिसांमध्ये हाणामारीचा प्रकार व्हायरल झाला आहे.
जळगाव शहरात २५ ऑगस्ट रोजी भरदुपारी बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघं पोलिसांमध्ये हाणामारी झाली. त्याचा व्हीडिओसमोर आला आहे. पोलिसांच्या हाणामारीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली ते पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली. ते जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे.
जळगावात पोलिसांमध्येच हाणमारी…लोकांचे संरक्षण कसे होणार? pic.twitter.com/ydFDbnQGCd
— jitendra (@jitendrazavar) August 26, 2024
रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये पोलिसांनी मद्यपान केले. हे पोलीस बारमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी दोन ग्लासही त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू होती. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व चांगलीच पकडापकडी झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला.
पोलिसांच्या गाडीत चालक असलेला पोलीस कार काढताना दोन दुचाकींना धक्का दिला. त्यामुळे त्या दुचाकी पाडल्या. त्यानंतर काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाल्याची घटना यावेळी घडली. सुदैवाने यात मुलाला मोठी दुखापत झाली नाही.
हे ही वाचा…
पोलीस ठाण्यात रंगला जुगाराचा डाव, वर्दीवरील पोलिसांचे धुम्रपान…व्हिडिओ व्हायरल