दुःखाची संक्रांतः पतंग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून 12 वर्षीय मुलाचा गळफास; तर पतंग काढताना 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

| Updated on: Jan 14, 2022 | 4:10 PM

जळगावमध्ये पतंगामुळे 2 किशोरवयीन मुलांनी प्राण गमावल्याच्या चटका लावणाऱ्या 2 वेगवेगवेगळ्या ऐन मकरसंक्रातीदिवशी घटना घडल्या. त्यामुळे पंचक्रोशीत दुःखाची संक्रांत दाटलीय.

दुःखाची संक्रांतः पतंग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून 12 वर्षीय मुलाचा गळफास; तर पतंग काढताना 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
kite
Follow us on

जळगावः जळगावमध्ये पतंगामुळे दोन किशोरवयीन मुलांनी प्राण गमावल्याच्या चटका लावणाऱ्या दोन वेगवेगवेगळ्या ऐन मकरसंक्रातीदिवशी घटना घडल्या. पहिल्या घटनेत पतंग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून एका 12 वर्षांच्या मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलाला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने जीव गमावावा लागला. त्यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ आहे. मुलांना थोडाफार विरोध केला, तर ते किती टोकाचे पाऊल उचलू शकतात, याची प्रचिती एका घटनेतून आली. तर मुलांना थोडी सूट दिली, तर ते ही जीवावर बेतू शकते, हे समोर आले. त्यामुळे कुठल्या गोष्टीला नकार द्यायचा तरी कसा आणि करायचे तरी काय, असा प्रश्न पालकांना पडलाय. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही गेल्या महिन्यात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

नेमके घडले काय?

मकरसंक्रांत म्हटले की पतंग उडवणे आलेच. खरे तर मुले संक्रांतीच्या कितीतरी दिवशी अगोदर पतंग उडवायला सुरुवात करतात. गल्लोगल्ली पतंग आणि त्यामागे फिरणारी मुले असे चित्र नसते, तर गच्चीगच्चीवर मुले आणि पतंग असे चित्र बहुदा शहरात असते. जिथे मैदाने आणि मोकळी जागा असेल, अशी शहरे यासाठी अपवाद असतात. जळगावमध्येही गेल्या काही दिवसांपासून मुलांची पतंग उडवण्याची धूम सुरूय. त्यात शुक्रवारी कांचननगर येथील यश रमेश राजपूत याला त्याच्या घरातील व्यक्तींना पतंग उडवण्यासाठी बाहेर पाठवले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले. झोक्याच्या दोरीने गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले. यश अवघ्या 12 वर्षांचा होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

पतंग काढताना शॉक

जळगावमध्येच दुसरी एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यात मोकळ्या मैदानात पतंग उडवताना एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीनिमित्त पंतगोत्सव रंगला होता. मोकळ्या मैदानात काटाकाटी सुरू होती. तितक्यात एका मुलाचा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्याचा प्रयत्न करताना दहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी मृत घोषित केले.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली