गंभीर गुन्हा केल्यामुळे गुन्हेगाराला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यास सर्वत्र खळबळ माजते. देशात एखाद्याल्या मृत्यूची शिक्षा सुनावल्यास तो गुन्हागार चर्चेत राहतो. भारतात जेव्हा कोणता गुन्हेगार गंभीर गुन्हा करतो तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. पण गुन्हेगाराला फासावर लटकवण्यापूर्वी काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. यामध्ये फाशी देण्यासाठी लागणारी दोरी, फाशी देण्याची वेळ आणि फाशी देण्यापूर्वीची प्रक्रिया… यांसारख्या अनेक गोष्टी असतात.
पण तुम्हाला माहिती आहे भारतात कैद्याला फासावर लटकवण्याआधी जल्लाद कैद्याच्या कानात काय म्हणतो. त्यानंतरच कैद्याला फाशी दिली जाते. तर आज जाणून घेऊ कैद्याला फासावर लटकवण्याआधी जल्लाद त्याच्या कानात काय म्हणतो. सर्वप्रथम तर कोणत्याही अपराधीला फाशी देण्यापूर्वी जल्लाद कैद्याच्या वजनाच्या पुतळ्याला फासावर लटकवतो आणि ट्रायल करतो. त्यानंतर फाशी देण्यासाठी लागणारी दोरी मागवली जाते.
फाशी देण्याआधी कैद्याची स्वच्छ अंघोळ केली जाते आणि त्याला नवे कपडे घातले जातात. त्यानंतर कैद्याला ठरलेल्या ठिकाणी नेलं जातं. कैद्याला फाशी देताना त्याठिकाणी जेल अधिक्षक, एग्जीक्यूटिव्ह मजिस्ट्रेट, जल्लाद आणि डॉक्टर उपस्थित असतात. यांच्याशिवाय कैद्याला फाशी दिली जाऊ शकत नाही.
सकाळ होण्याआधी कैद्याला फाशी दिली जाते. तुरुंगातील इतर कैदी आणि अधिकाऱ्यांच्या कामात कोणत्या अडचणी येऊ नये म्हणून कैद्याला सकाळ होण्याआधी फाशी दिली जाते. दुसरं कारण म्हणजे कैद्याच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ मिळतो. कैद्याला फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली जाते. ज्यामध्ये कुटुंबियांची भेट, चांगलं जेवण अशा अन्य इच्छा कैद्याच्या पूर्ण केल्या जातात.
फाशी देण्यापूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात म्हणतो की – “हिंदूंना राम-राम आणि मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कर्तव्याने बाध्य आहे. तू सत्य आणि धर्माच्या मार्गावर जावे अशी माझी इच्छा आहे.” असं जल्लाद म्हणतो आणि त्यानंतर कैद्याला फाशी दिली जाते. भारतात आतापर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.