रांची : झारखंडमधील गुमला जिल्ह्यातून खुनाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीये. मृत महिलेचा आधी गळा कापण्यात आला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येच्या पद्धतीमुळे सर्वसामान्यांसोबतच पोलिसही हैराण झाले आहेत. या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, घाघरा पोलिसांनी गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस स्टेशन हद्दीतील हपामुनी साधू टोंगरीजवळ एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला होता. महिलेचा गळा चिरुन तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार करण्यात आले होते. घटनास्थळावरुन चाकू, जेंट्स बेल्ट, ब्लूटूथ, छोटा मोबाईल, चप्पलच्या दोन जोडी (महिला-पुरुष) इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ मनीष चंद्र लाल, निरीक्षक एस मंडल आणि एसएचओ अभिनव कुमार दलबलसह घटनास्थळी पोहोचले. महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्यात आला. एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी सांगितले की, हापामुनी साधू टोंगरीजवळ एका महिलेची मान कापण्यात आल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणाचा तपास सुरु असताना लोहरदगा येथील सेन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडगाव सेमरटोली येथील सुनीता ओराव (वय 30 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. गुमला घाघरा ब्लॉकमधील दोडांग येथे मृतकेचे माहेर आहे. मृत महिलेचा पती बंधू ओराव हा दोन दिवसांपासून सासरी होता. सुनीता गुरुवारी सायंकाळी घाघरा बाजार येथे वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या सासरच्या घराकडे निघाल्या. त्याचवेळी अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचा गळा चिरुन आणि दगडाने ठेचून त्यांचा खून केला. मृत सुनीता ओराव यांना चार मुले आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रामस्थांना महिलेचा मृतदेह आढळला
सकाळी हापामुनी गावातील साधू टोंगरीजवळ ग्रामस्थांना महिलेचा मृतदेह दिसला. त्यानंतर महिलेच्या हत्येची बातमी गावात पसरली. या घटनेची माहिती घाघरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता ही महिला लोहरदगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडगाव सेमरटोली गावातील सुनीता असल्याची माहिती मिळाली. हत्येच्या प्रत्येक अँगलवर पोलीस तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.
Afghanistan Bomb blast: मशिदीत स्फोट, मौलवीसह 12 लोक जखमी, 3 मृत्यू#Afghanistan #AfghanistanToday #afghanistanblast #afghanistancrisis https://t.co/vB5pksaEEC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2021
संबंधित बातम्या :
धक्कादायकः अडीच दिवसाला बलात्कार, 6 दिवसाला खून, बीडचा क्राइम रेट घातकच!