Rape on Women | भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने FIR मध्ये जे म्हटलय, ते खूपच भयानक आहे. या परदेशी महिलेवर सात आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी हे निषेधार्ह कृत्य करताना महिलेला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी संपूर्ण गुन्ह्यादरम्यान महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधून ठेवले. त्याला सुद्धा मारहाण केली. ‘ते मला मारुन टाकणार की, काय अस क्षणभर मला वाटलं होतं’, असं या महिलेने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. झारखंडच्या दुमका येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
‘मी आज जिवंत आहे, त्यासाठी देवाची आभारी आहे’ असं या महिलेने म्हटलय. रविवारपर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दुमका पोलिसांनी दिली. अजून चौघांचा शोध सुरु आहे. पीडित महिलेच्या कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र टीम बनवण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेऊन स्वतंत्र रिपोर्ट् मागवला आहे. झारखंडमधल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. पीडित महिला स्पेनमधून आली होती.
भारतात येण्याआधी हे जोडप गेलेलं पाकिस्तानात
सर्व आरोपी कुंजो आणि आसपासच्या गावातील आहेत. आतापर्यंतच्या चौकशीतून आरोपींचा हा पहिला गुन्हा असल्याच स्पष्ट झालय. पण अजूनही चौकशी सुरु आहे. काही आरोपी इंग्रजी शब्दांचा वापर करत होते, असं पीडित महिलेने म्हटलय. परदेशातून हे पती-पत्नी टूरिस्ट वीजावर भारतात आले होते. हे जोडप भारतात येण्याआधी पाकिस्तानात गेलं होतं. पाकिस्तानातून बांग्लादेश आणि तिथून झारखंड दुमका येथे पोहोचले होते. दुमका हंसडीहा पोलीस ठाणे क्षेत्र कुंजी गावात तंबू टाकून हे जोडप थांबलं होतं.