रांची : शारीरिक संबंधांसाठी अश्लील फोटो व्हायरल करतो, अशी धमकी देणाऱ्या भावोजी विरोधात मेव्हणीने पोलिसात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन आरोपी भावोजी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण झारखंडमध्ये सुरु आहे (Jharkhand man blackmail sister in law).
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकार हा धनबाद जिल्ह्यातील झरिया येथे घडला आहे. आरोपी भावोजी हा अलकडीहा भागाचा रहिवासी आहे. या आरोपीचं नाव रंजन सिंह असं आहे. त्याच्याविरोधात त्याच्या मेव्हणीनेच पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भावोजी रंजन सिंह हा तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. धमकी देऊन तो शारीरिक संबंध बनवण्याचा दबाव टाकतोय, अशी तक्रार संबंधित तरुणीने केली.
पोलिसांकडून तक्रारीची दखल
पीडित तरुणीने मोठं धाडस करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपल्या भावोजीची तक्रार केली. पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने घेतली. त्यांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तरुणीच्या भावोजीला तातडीने अटक केली. त्याच्यावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Jharkhand man blackmail sister in law).
पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेबाबत धनबाद पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी कुमारी विशाखा यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्या मुलीला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला, ती स्वत: पोलीस ठाण्यात आली आणि तिने तक्रार केली. तिच्या तक्रारीनंतर आरोपीवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली”, अशी प्रतिक्रिया कुमारी विशाखा यांनी दिली.