अनीता चौधरी हत्याकांडातील गुंता वाढत चालला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी गुलामुद्दीनची पत्नी आबिदाला अटक केली आहे. तिचाही या हत्याकांडातील सहआरोपींमध्ये समावेश केलाय. अनिताच्या हत्येचे पुरावे मिटवण्यामध्ये आबिदा सुद्धा सहभागी होती, असं पोलिसांच म्हणणं आहे. अजूनपर्यंत गुलामुद्दीनला पोलीस अटक करु शकलेले नाहीत. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. काही महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत, लवकर गुलामुद्दीनला अटक करु असं पोलिसांनी सांगितलं. राजस्थानच्या जोधपूरमध्ये हे भयानक हत्याकांड घडलं.
पोलिसांनी अनिता चौधरी हत्याकांड प्रकरणात काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. जोधपूरचे डीसीपी राज ऋषि यांनी सांगितलं की, 27 ऑक्टोंबरच्या दुपारी अनिता आपल्या मर्जीने गुलामुद्दीन जवळ गेली होती. गुलामुद्दीनला ती ओळखायची. गुलामुद्दीनच्या डोक्यावर कर्ज होतं. अलीकडेच त्याने बोरानाडामध्ये घर विकत घेतलं होतं. त्यासाठी 12 लाखाच कर्ज घेतलेलं. जुगार आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठी रक्कम तो हरलेला. त्याला पैशांची गरज होती.
मृतदेहाचे तुकडे करण्याआधी बायको-मुलांना बाहेर पाठवलं
अनिताची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कापण्याआधी गुलामुद्दीनने त्याची पत्नी आणि मुलांना बाहेर पाठवलं. आबिदाने दिलेल्या माहितीनुसार घराजवळ खड्डा खोदल्यानंतर त्याच्या 10 फुट आत अनिताचा मृतदेह सापडला. अनिताच्या मृतदेहाचे चॉपरने तुकडे केल्याच एफएसएल रिपोर्टमध्ये समोर आलय. या संपूर्ण प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. गुलामुद्दीनच्या अटकेनंतरच आणखी महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.
पहिला प्रश्न
अनीता चौधरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला अजून अटक झालेली नाही. त्यामुळे हत्या कशी केली? त्यामागे काय कारणं आहेत अजून? याचा खुलासा झालेला नाही. बेशुद्धीच्या ओव्हरडोसमुळे अनिताचा मृत्यू झाला की, तिची हत्या करण्यात आली? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
दुसरा प्रश्न
अनिताच्या मृतदेहाचे 6 तुकडे मिळाले. चॉपरने मृतदेह कापण्यात आलेला. पण हे अजून स्पष्ट नाहीय की, अनिताला कापलं तेव्हा ती बेशुद्ध होती की, आधीच तिचा मृत्यू झालेला.
तिसरा प्रश्न
लुटीच्या इराद्याने ही हत्या झाल्याच पोलिसांच म्हणणं आहे. गुलामुद्दीनने पैसे घेऊन बोलवलेलं का? पण कुटुंबाने अजून पैशाच्या चोरीची कुठलीही तक्रार दिलेली नाही.
प्रश्न चौथा
रिक्षा चालकाने सांगितलं की, अनिता ऑटो रिक्षामध्ये बसलेली. गुलामुद्दीन तिथे एक्टिवा घेऊन आला. पण अनिता रिक्षातून उतरुन एक्टिवावर बसून गुलामुद्दीनच्या घरी गेली नाही. रिक्षा एक्टिवाच्या मागोमाग घरापर्यंत गेली.
प्रश्न पाचवा
अनिताचा मृतदेह ज्या कपड्यांमध्ये मिळाला ते आणि रिक्षामध्ये बसतानाचे तिचे कपडे वेगळे होते. पार्लरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसलय. अनिता कपडे कसे बदलले?