Kalyan Fraud : Olx वरून गाड्या विकत घेताय सावधान… ऑनलाईन चोरीच्या घटनांनी कल्याणकरांची झोप उडाली

| Updated on: Jul 20, 2022 | 9:08 PM

दोघांकडून पोलिसांनी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 14 गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेली 11 वाहने जप्त केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणि एक रिक्षा यांचा समावेश आहे.

Kalyan Fraud : Olx वरून गाड्या विकत घेताय सावधान... ऑनलाईन चोरीच्या घटनांनी कल्याणकरांची झोप उडाली
olx वर चोरीच्या गाड्या विकणारी दुकली गजाआड
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

कल्याण : कल्याण महात्मा फुले पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक (Arrest) केली आहे. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख व जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावे असून दोघे सख्खे भाऊ आहेत. हे दोघे ऑनलाईन खरेदी (Online Shopping) विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या olx या साईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी सारखीच दुचाकी चोरी करायचे. यानंतर ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत संबंधित मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत या कागदपत्रावरून चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे. त्यानंतर चोरीची गाडी olx विकायचे. या दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. या 14 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 11 वाहने जप्त (Seized) केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणि एका रिक्षा यांचा समावेश आहे. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.

आरोपींकडून 14 गुन्ह्यांची उकल करत 11 वाहने जप्त

कल्याण महात्मा फुले पोलिसांना एक इसम चोरीची बुलेट मोटरसायकल विकण्यासाठी कल्याण पश्चिम बैल बाजार या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी महम्मद अकबर शेख याला शिताफीने अटक केली. गुन्ह्यात ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे आणि त्याची ओएल एक्स वर बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसाना दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेख याला देखील पोलिसांनी अटक करत या दोघांकडून पोलिसांनी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 14 गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेली 11 वाहने जप्त केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणि एक रिक्षा यांचा समावेश आहे.

दरम्यान आरोपी ऑनलाईन विक्रीसाठी असलेले वाहन कॉपी करून हुबेहूब त्याच गाडीसारखी दिसणारी गाडी चोरी करायचे. यानंतर खऱ्या गाडीचे ऑनलाईन पेपर मागून घेत त्या कागदपत्राच्या आधारे बनावट पेपर बनवून त्याआधारे किंमत कमी करून या चोरलेल्या गाड्यांची विक्री olx वर करायची. या पद्धतीने हे आरोपी गुन्हे करत असल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. (Kalyan police arrested two thieves who were selling stolen cars on OLX)

हे सुद्धा वाचा