मुंबई : कांदिवलीतून एक हृदयद्रावक (Kandivli Home Collapse) घटना समोर आली आहे. या घटनेत एका निष्पाप मुलाता दुर्दैवी (Child Death) अंत झाला आहे. तर याच मुलाच्या घरातील एतर चार जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात येते आहेत. एका चाळीतील (Chawl) घर कोसळलं. घर कोसळण्याची घटन घडली, त्यावेळी घरातील लोक आतमध्येच दबली गेली. दोन महिला, दोन लहान मुलं आणि आणखी एक मुलगा यावेळी घरातच होते. घर कोसळल्यामुळे या सगळ्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली. यात एका मुलाला जबर मार लागल्यानं त्याची प्रकृती सुरुवातीपासून चिंताजनक असल्याचं समोर येत होतं. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या दुर्दैवी घटने, या मुलाचा प्राण गेलाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, इतर चार जणही जखमी असून त्यांनाही नजीकच्या रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कांदिवली पश्चिमेला ही घटना घडली. कांदिवली पश्चिमेच्या इस्लाम कंपाऊंड परिसरातील उत्तर भारतीय सेवा संघातील चाळी वन प्लस वन केलेलं घर कोसळलं. ज्या ठिकाणी हे घर आहे, त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं गटार तयार करण्यासाठी खोदकाम सुरु होतं. त्यादरम्यान, ही दर्दैवी घटना घडली. घर कोसळल्यानं घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडला होती. दरम्यान, यानंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. सध्या कांदिवली पोलीस या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी ढिगारा हटवण्याचे काम सुरू केलं होतं.
या भागातील स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी बीएमसीला या घटनेला जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केला आहे. बीएमसीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप कमलेश यांनी केलाय. दरम्यान, घर कोसळल्यामुळे कांदिवलीतील चाळीत राहणारं अख्ख कुटुंब आणि त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी बीएमसी कंत्राटदाराला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर आता काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.
डबल मर्डरने जळगाव हादरलं, मरणारे दोन्ही तरूण, नेमकं घडलं काय?
Crime : दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा, 20 यांत्रिकी बोटींसह 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त