सिंधुदुर्गः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून, 3 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
हाच तो बाईट, ज्यामुळे राणेंना नोटीस मिळाली
मग एवढे पोलीस का?
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘पोलीस एवढे का आले, याची माहिती घ्या. काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं? एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी. नाव गोवायचं आणि 307 लावायचं, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचा असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान, आता याप्रकरणी राणेंना नोटीस बजावल्याने हे प्रकरण अजून चिघळले आहे.
इतर बातम्याः
Untimely Rain : भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान