Ketaki Chitale : केतकीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा तर तिच्या पोस्टवर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांचाही पोलीसांना शोध, दोघ नेमके कुठे?

| Updated on: May 21, 2022 | 3:13 PM

घणसोली येथील रहिवासी व आंबेडकर युवा संघाचा सदस्य स्वप्नील जगताप यांनी तक्रार दिल्यानंतर मार्च 2020 मध्ये केतकी चितळे आणि फेसबुक वापरकर्ता सूरज शिंदे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ketaki Chitale : केतकीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा तर तिच्या पोस्टवर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांचाही पोलीसांना शोध, दोघ नेमके कुठे?
अभिनेत्री केतकी चितळे
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई – केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट प्रवास करतात अशी पोस्ट फेसबुकवर (Facebook) टाकली होती. त्या फेसबुक पोस्टवर सूरज शिंदेसह दोन जणांनी खूप खालच्या भाषेत कमेंट केल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आयपीसी 295 अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 9 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात शिरसाठ न्यायाधीशांनी केतकी चितळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. म्हणजे तेव्हा अटक केलेली नव्हती. आम्ही पाठपुरावा करत होतो असे पोलिसांनी सांगितले होते. आम्ही फक्त 295 कायद्याअंतर्गत लावला आहे. त्यामध्ये 295 (अ) अजून ऍड करायचा आहे, आम्हाला वरून परवानगी अजून भेटत नाही. त्यामुळे तिला अटक केलेली नाही. आता या गुन्ह्यात सध्या 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यानंतर तिचं एमसीआर होईल. तिचे वकील जामिनासाठी अर्ज करतील, पण आम्ही 100 टक्के तो जमीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती फिर्यादी स्वप्नील जगताप (Swapnil Jagtap) यांनी दिली.

केतकीच्या अडचणीत वाढ होणार

घणसोली येथील रहिवासी व आंबेडकर युवा संघाचा सदस्य स्वप्नील जगताप यांनी तक्रार दिल्यानंतर मार्च 2020 मध्ये केतकी चितळे आणि फेसबुक वापरकर्ता सूरज शिंदे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आधीच पोलीस कोठडीत असलेली केतकी चितळे हिला गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिच्यावर 2020 मध्ये दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

उर्वरित दोघांचा शोध सुरू

केतकी चितळेवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे, ठाणे सत्र न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. केतकीच्या पोस्टवर तीन जणांनी गलिच्छ भाषेत कमेंट्स केल्या होत्या.

त्यातील एक सूरज शिंदे हा फरार आहे. नवी मुंबई पोलीस उर्वरित दोघांचा शोध घेत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.