धर्मशाला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या (Himachal Pradesh Legislative Assembly) मुख्य गेट आणि सीमा भिंतींवर खलिस्तानचे झेंडे (Khalistan flags) बांधल्याचं आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशात धर्मशाला (Dharamshala) येथे आज (रविवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कांगडाचे एसपी खुशाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा किंवा आज पहाटे घडली असावी. “आम्ही विधानसभेच्या गेटवरुन खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. हे पंजाबमधील काही पर्यटकांचे कृत्य असू शकते. आम्ही या प्रकरणी आज गुन्हा नोंदवणार आहोत” अशी माहिती त्यांनी दिली.
#WATCH Khalistan flags found tied on the main gate & boundary wall of the Himachal Pradesh Legislative Assembly in Dharamshala today morning pic.twitter.com/zzYk5xKmVg
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 8, 2022
गेल्या महिन्यात शिख्स फॉर जस्टिस (SFJ) नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांनी शिमल्यात खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते.