हैदराबाद पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात आलं की, मुलीला दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. सुजना इन आणि थ्री कैसल्स अशी हॉटेलची नावं आहेत. संशयितानं तिथं एक रात्र घालविली. पोलीस आता हॉटेलच्या रुमची तपासणी करत आहेत. तसेच मुलीची आणि आरोपींना विचारपूस करत आहेत. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एक आरोपी 26 वर्षीय नईमठ आणि दुसरा सय्यद रबीश यांनी सामूहिक अत्याचार आणि पौक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 13 सप्टेंबरला मुलीच्या आईनं हैदराबादच्या दबीरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. 14 वर्षीय मुलगी औषधी खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेली. पण, घरी परत आली नव्हती.
नशिले पदार्थ देऊन मुलीचं शोषण करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. मुलीला कारमध्ये बसविण्यात आलं. त्यामुळं पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 14 सप्टेंबरला मुलगी शहरातील एका ठिकाणी सापडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मुलीचं समुपदेशन करण्यात आलं. तिची मेडिकल तसेच फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली.
नशेचे इंजेक्शन दिल्याचा आरोपी मुलीच्या आईनं केला आहे. दोन्ही आरोपींनी तिचं लैंगिक शोषण केलं.तसेच तिला दारू पाजण्यात आली. रबीश हा हायस्कूल डॉप आउट आहे. नईमठ हे सौदी अबरमध्ये एक आप्टिकल स्टोर्स चालवित होता. तिथून तो मार्चमध्ये परतला. मुलीनं प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडली होती. ती तिचा शेजारी असलेल्या रबीशला ओळखत होती.