प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

| Updated on: Dec 23, 2020 | 5:28 PM

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. (Kirit Somaiya files complaint against Pratap Sarnaik at ed)

प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात
Kirit Somaiya
Follow us on

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर 112 साताबारे असल्याची माहितीच सोमय्या यांनी ईडीला दिल्याने सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (Kirit Somaiya files complaint against Pratap Sarnaik at ed)

प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची गेल्या चार तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आलेले आहेत. तर विहंग यांची दुसऱ्यांदा ईडीची चौकशी सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या आज अचानक ईडी कार्यालयात पोहोचले. सोमय्या यांनी ईडी कार्यालयात जाऊन विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे.

सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

एमएमआरडीएवर टीका

यावेळी त्यांनी कांजूरमार्ग कारशेडवरूनही सरकारवर टीका केली आहे. एमएमआरडीने काय कारनामे केले हे कांजूरमार्ग कारशेडमध्ये सर्वांनी पाहिले आहेच, असं सांगतानाच एमएमआरडीए ठाकरे सरकारच्या सचिवासारखे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

काय आहे विहंग हौसिंग घोटाळा?

सोमय्या यांनी 16 डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.

सरनाईकांकडून खंडन

“विहंग गार्डन्स ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत नाही. ती इमारत संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन उभारण्यात आली आहे. त्यामुळे माझी बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कोर्टात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,” असे प्रताप सरनाईक म्हणाले होते. तसेच, त्यांनी सोमय्या यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असल्याचे म्हणत, सर्व आरोप फेटाळले आहेत. (Kirit Somaiya files complaint against Pratap Sarnaik at ed)

 

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईकांवर किरीट सोमय्यांचा नवा आरोप! कारवाईची मागणी

सोमय्यांचा गंभीर आरोप, सरनाईकांचा शंभर कोटींचा दावा

(Kirit Somaiya files complaint against Pratap Sarnaik at ed)