कोल्हापूर : दैनंदिन आर्थिक व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटांबाबत धक्कादायक (Kolhapur crime news) माहिती समोर आलीय. 100, 200 आणि 500 च्या खोटा नोटा (Fake notes) खपवणारी एक टोळी सक्रिय होती. या टोळीच्या पोलिसांनी (Kolhapur Police) मुसक्या आवळल्या आहे. कोल्हापुरातून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण तिघा जणांना अटक करण्यात आलीय. हे तिघेही जण मजूर असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपयांपेक्षाही अधिकच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. तसंच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्यदेखील पोलिसांनी जप्त केलंय. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही खोट्या नोटा खपवण्याच आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागावातून पोलिसांनी तिघा मजुरांना अटक केली. हे तिधे जण बनावट नोटा खपवण्याचा गोरखधंदा करत होते. या तिघांकडून एक लाख 88 हजार रुपयांच्या खोट्या नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. कर्नाटकातून ही जप्तीची कारवाई करण्यात आलीय. आता या तिघा आरोपींची कसून चौकशी कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस करत आहेत. नेमक्या या खोट्या नोटा खपवल्या कशा जात होत्या, हे या चौकशीतून आता समोर येईल.
अनेकदा चलनात खोट्या नोटाही वापरात असतात. त्यामुळे रोखीचे व्यवहार करताना नोटांची पडताळणी करजे गरजेचं असतं. खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती, यातील फरक जाणून घेण्यासाठी काही सूचनाही आरबीआय कडून देण्यात आल्या आहेत. खऱ्या नोटेची पडताळणी करण्यासाठी खालील गोष्टींचा उपयोग करावा…