कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सगळा देश हादरला आहे. आज देशातील अनेक सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर या घटनेविरोधात आंदोलन करत आहेत. अत्यंत क्रूर, निर्घृण पद्धतीने महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. आरोपीने ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केली. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीला पॉर्न पाहण्याची सवय होती. त्याच्या मोबाइलमध्ये अशा अनेक क्लिप सापडल्या आहेत.संजॉय रॉय असं आरोपीच नाव आहे. विचलित करणारं, हिंसक पॉर्न पाहण्याची त्याला सवय होती. हे अनैसर्गिक आहे असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
“संजॉय रॉय व्याभिचारी आहे. त्याची चार लग्न झाली आहेत, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्याच्या मोबाइल फोनमध्ये जो पॉर्नोग्रफीचा कंटेट सापडलाय, तो हिंसक, विचलित करणारा आहे. हे असं पाहण अनैसर्गिक आहे” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पत्नीसोबत गैरवर्तन करण्याचा त्याचा इतिहास आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं. पहिली पत्नी बीहाला येथे राहणारी तर दुसरी पत्नी पार्क सर्कस येथे राहणारी होती, असं संजॉय रॉयच्या शेजऱ्यांनी सांगितलं. त्याचं तिसरं लग्न सुद्धा फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्याने अलीपोर येथे राहणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं असं शेजाऱ्यांनी सांगितलं.
शेजाऱ्यांनी काय सांगितलं?
आरोपीच्या घरातून सतत भांडणाचे आवाज यायचे अशी तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांशी बोलताना केली. “चौथी पत्नी अलीपोर येथील पेट्रोल पंपावर काम करायची. घरगुती हिंसाचाराची तक्रार तिने नोंदवली होती. तिने संजॉयपासून कायदेशीर घटस्फोट घेतला” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
आरोपीच्या आईने काय सांगितलं?
संजॉय रॉय ट्रेन बॉक्सर होता. आरजी कार मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोलीस चौकी बाहेर तो तैनात होता. आरोपीच्या आईने त्याची बाजू घेतली. माझा मुलगा निर्दोष असून त्याला या सगळ्यामध्ये गोवण्यात येत आहे असं तिने सांगितलं. पोलिसांनी संजॉय रॉय विरोधात बलात्काराच कलम 64 आणि 103 हत्येच्या कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्या घडला त्या ठिकाणी पोलिसांना आरोपीचा ब्लू टूथ हेडसेट सापडला. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली.