नवी दिल्ली : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चार भोंदू सायबर ठगांना सायबर सेलने अटक केली आहे. आरोपींमध्ये एक महिलाही आहे. आर कुमार (23), मोहन गार्डन, एम सिंग (25), टी कुमार (25) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच मायापुरी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेचाही यात समावेश आहे. https://theresumesearch.com, https://www.jobsearchnet.in, https://resumetofill.com या वेबसाइट या टोळीने तयार केल्या होत्या. तिन्ही वेबसाइट बनावट होत्या. घरातून कामाच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत असत. यासंदर्भात 60 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जे लोक त्यांच्या जाळ्यात अडकले होते त्यांना जॉबचे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सांगितले जात होते, ज्यासाठी ते पीडितांशी कायदेशीर करार करत असत. एखाद्या व्यक्तीने दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न केल्यास त्याला दंड भरावा लागेल, असे कलमही या कायदेशीर करारात ठेवण्यात आले होते. ही टोळी एवढी हुशार होती की पीडितांना एवढं मोठं टार्गेट द्यायची की ते वेळेत पूर्ण करू शकत नव्हते आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईची धमकी देऊन पीडितांकडून पैसे उकळायचे, असे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
आरोपींनी खुलासा केला आहे की बहुतेक लोक डेटा एन्ट्रीच्या कामासाठी फसायचे. घरून काम करणाऱ्या लोकांच्या शोधात त्याने लोकांचे बायोडेटा गोळा केले होते. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक व ह्यूमन इंटेलिजन्सच्या मदतीने या टोळीतील एका महिलेसह चार जणांना अटक केली. (Large targets to be paid in the name of work from home, to be fined if not complete)
इतर बातम्या
प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा
बदनामी केल्याचा मनात राग, जमिनीवर डोकं आपटून काटा काढला, उल्हासनगरात माथेफिरुला बेड्या