Lawrence Bishnoi Love Story: गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई गँगने ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लॉरेन्स नाव चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई स्वतः तुरुंगात बंद आहे. पण तुरुंगात असून देखील लॉरेन्स त्याच्या गँगकडून अनेक धक्कादायक गोष्टी घडवून आणत आहे. लॉरेन्स एक गुंड आहे. त्याने आतापर्यंत अनेक हत्या आणि सेलिब्रिटींना धमकावलं असल्याचं सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गर्लफ्रेंडच्या हत्येबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोई याच्या ‘लव्हस्टोरी’ची सुरुवात 2008 मध्ये झाली. तेव्हा लॉरेन्स 10 वी इयत्तेत शिकत होता. शालेय शिक्षण घेत असताना लॉरेन्स, काजल नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. काजल हिला देखील लॉरेन्स आवडू लागला होता. कालांतराने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
लॉरेन्स बिश्नोई याचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमधील अबोहर येथील कॉन्व्हेंट शाळेत झालं. त्यानंतर लॉरेन्स गर्लफ्रेंडसोबत चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी लग्न करून संसार थाटण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण दोघांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं.
सांगायचं झालं तर, लॉरेन्स बिश्नोईने कॉलेजमध्ये एक गँग तयार केली होती. त्यानंतर त्याने महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत प्रतिस्पर्धी गँगकडून लॉरेन्सला हार स्वीकारावी लागली. तेव्हा दोन्ही गँग आमने – सामने आले.
दरम्यान, प्रतिस्पर्धी गँगने लॉरेन्सच्या गर्लफ्रेंडला जिवंत जाळल्याचा दावा करण्यात आला. मात्र, हा केवळ अपघात असल्याचं देखील सांगण्यात आलं. बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने पंजाब युनिव्हर्सिटीची स्टुडंट ऑर्गनायझेशन (SOPU) नावाची गँग सक्रिय केली.
लहानपणीचं प्रेम गमावल्यामुळे लॉरेन्स संतापला होता. तेव्हा लॉरेन्सने एर रिव्हाल्वर खरेदी केली आणि प्रतिस्पर्धी गँगवर गोळीबार केला. ज्यांच्यावर काजल हिची हत्या केल्याचा आरोप होता. अशा प्रकार लॉरेन्स बिश्नोई याची गुन्हेगारी विश्वात एन्ट्री झाली.