लोणावळा हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र याच लोणावळ्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळ्यातील एका बंगल्यात पॉर्न व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांना अटक केली आहे. यामुळे लोणावळ्यात एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून एका बंगल्यात हा गोरख धंदा सुरू होता. भारतातीतल वेगवेगळ्या राज्यातून काही तरूण लोणावळ्यात एकत्र येऊन हे ‘नको ते उद्योग ‘ करत ‘तसले’ व्हिडीओ शूट करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ तयार करण्यावर बंदी आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी आत्तापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. तसेच पॉर्न व्हिडीओ शूट करण्यासाठी वापरण्यात आलेला कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच त्यांच्याकडील काही व्हिडीओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या राज्यातून काही तरूण-तरूणी लोणावळ्यातील बंगल्यावर एकत्र आले होते. अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वजण या बंगल्यात पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे. हे माहीत असतानादेखील बंगल्यात ही 15 तरूणांची टोळी बिनधास्तपणे पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ५ तरूणींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेले सर्व जण भारतातील विविध राज्यांतील आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करत 13 जणांना बेड्या ठोकल्या. या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि. कलम 292,293,34. माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धुमाळ हे सदर गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.