इंदूर : लव्ह जिहादच एक वेगळच प्रकरण समोर आलय. एक युवक आपली ओळख लपवून हिंदू मुलींसोबत मैत्री करायचा. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा. मुलीचा विश्वास जिंकल्यानंतर तो त्यांना सुलभ शौचालयात नेऊन तिथे अश्लील कृत्य करायचा. आरोपी शौचालयतील कर्मचाऱ्यांना 200 रुपये एंट्री फी सुद्धा द्यायचा. आरोपीने बुधवारी सुद्धा आला होता. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरुन मोठा हंगामा झाला. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदोरमध्ये ही घटना घडली. बजरंग दलाने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीची चौकशी केली. काऊंसिलिंगची प्रोसेस सुरु केली. इंदोरच्या परदेसीपुरा ठाणा क्षेत्रातील हे प्रकरण आहे. आरोपीने जनता क्वार्टर जवळ असलेल्या सुलभ शौचालयात हे कृत्य केलं.
शौचलायतील कर्मचाऱ्यांची आरोपी साहिलसोबत मैत्री होती, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. साहिल या भागात हिंदू नाव धारण करुन फिरायचा. हिंदू मुलींशी ओळख करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करायचा. आरोपी साहिल नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुलीला फसवून इथे घेऊन यायचा. सुलभ शौचालयाच्या कर्मचाऱ्यांना तो 200 रुपये द्यायचा. त्या बदल्यात ते शौचालयातील जागा द्यायचे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री माहिती मिळाली की, साहिल एका मुलीला घेऊन शौचालयात आलाय. त्यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विकलांग टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडला नाही.
आरोपीने त्याच हिंदू नाव सांगितलं
आतामध्ये आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये होता. बराचचवेळ दरवाजा वाजवल्यानंतर आरोपीने गेट उघडला, त्यावेळी त्याची चौकशी झाली. आरोपीने त्याच हिंदू नाव सांगितलं. त्याच्याकडे आधार कार्ड मागताच त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्याची खरी ओळख उघड केली. आपल नाव तारीक असल्याच त्याने सांगितलं. मात्र या दरम्यान आरोपी आणि शौचालयाचा कर्मचारी पळण्यात यशस्वी ठरले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय. बजरंग दलाचे मालवा प्रांताचे अखाडा प्रमुख तनु शर्मा म्हणाले की, “जिहादी मानसिकतेचे लोक हिंदू युवतींना फसवून त्यांचं लैंगिक शोषण करतात”