भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. 12 दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीनेही इंदौरमध्ये आत्महत्या केली होती. तेव्हापासून ती मानसिक धक्क्यात होती. ही घटना उज्जैन शहरातील पोलीस स्टेशन जिवाजीगंज परिसरातील पिपलीनाका परिसरातील आहे.
बहिणीने पाहिलं गळफास घेतलेल्या अवस्थेत
मुलीच्या आत्महत्येची माहिती तिच्या बहिणीला सर्वात आधी मिळाली. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिने बहिणीला आधी पाहिलं. त्यानंतर लगेच तिने आपल्या कुटुंबियांना फोन करुन सांगितलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
आत्महत्येमध्ये काय समान दुवा
एएसपी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या मैत्रिणीनेही 12 दिवसांपूर्वी इंदौरमध्ये आत्महत्या केली होती. दोघीही अल्पवयीन आहेत आणि दोघींच्या आत्महत्येमागे काय समान दुवा आहे, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात पोलीस गुंतले आहेत.
पोलिसांचा फोन, मुलगी घाबरली
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मैत्रिणीने 25 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. तेव्हा पोलीस तिच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत होते, तेव्हाच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना तिच्या जवळच्या मैत्रिणीची माहिती मिळाली. जेव्हा इंदौर पोलिसांनी तिला फोन केला, तेव्हा ती घाबरली आणि काही सांगू शकली नाही.
आता दोघींच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जरी उच्च अधिकार्यांनी दोघांमधील सोशल मीडिया चॅट शेअर केले नसले तरी पोलिस लवकरच संपूर्ण प्रकरण उघड करतील, अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी उज्जैनमध्ये तिचे आजोबा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राहत होती. त्याचबरोबर तिची मैत्रीण देखील आधी तिच्या घराजवळ राहत होती. मात्र मैत्रीण जेव्हा इंदौरला शिफ्ट झाली, तेव्हा दोघीही सोशल मीडियावरुन बोलत असत.
जिम प्रशिक्षकाची इंदौरमध्ये आत्महत्या
दुसरीकडे, जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला होता. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात हा प्रकार घडला होता.
धाकट्या भावाने सर्वप्रथम मृतदेह पाहिला
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संयोगितागंज पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव गोपाल वर्मा आहे. तो जिम ट्रेनर होता. गोपालला नितेश आणि अंकुश असे दोन भाऊ आहेत. घटनेच्या वेळी त्याचे आई -वडीलही घरात होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याचा भाऊ नितेशने फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
चुलत बहिणींशी वाद
जिम प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोपाळचे काम काही महिन्यांपासून बरे चालले नव्हते. तसेच गेल्या काही काळापासून त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत मालमत्तेवरुन वाद सुरु होते. त्याच्या काकांना दोन मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणीही मध्ये पडत होत्या. यामुळे तो चुलत बहिणींवरही काही दिवस रागावला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?
“मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. माझी शेवटची इच्छा हीच आहे की माझ्या दोन्ही बहिणी गोलू आणि मुन्नू यांना माझा चेहराही दाखवू नका. माझी त्या दोघींवर कोणतीही नाराजी नाही. मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. प्रिती सिलावटलाही माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही.” असं गोपालने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :
सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या
ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप
भाजयुमोच्या 28 वर्षीय नेत्याची आत्महत्या, नस कापून गळफास, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीवर आरोप