मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीयं. जमिनीच्या वादातून काही लोकांनी एका आदिवासी महिलेच्या अंगावर डिझेल टाकून तिला पेटवून दिले आहे. खतरनाक बाब म्हणजे यासंबंधिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर देखील करण्यात आलायं. या व्हिडीओमध्ये ती महिला अर्धवट जळाली असल्याचे देखील दिसते आहे. आता या घटनेचा व्हिडिओही (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
महिलेला डिझेल टाकून पेटवल्यानंतर महिला गंभीररित्या भाजली आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र, काहनी में टि्स्ट म्हटंल्याप्रमाणे पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेने स्वत: आग लावून घेतली आहे. माहितीनुसार, या महिलेचे नाव रामप्यारी असे असून या शेतात पेरणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान ही घटना घडलीयं.
गेल्या काही दिवसांपूर्वी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर ही जमिनी महिला आणि तिच्या पतीला मिळाली होती. अगोदर ही जमीन आरोपींनी आपल्या ताब्यात ठेवली होती. तहसीलदार न्यायालयातून खटला जिंकल्यानंतर पती-पत्नीने आपल्या जमिनीची मशागत करून पेरणी करण्यास सुरूवात केल्याचे कळते आहे.
पीडित महिला रामप्यारी सहारिया शेतात काम करत असताना, त्याचवेळी आरोपीने शेतात जाऊन ट्रॅक्टरमधून डिझेल काढून ते महिलेच्या अंगावर ओतून पेटवून दिले. या घटनेत 10 जणांचा सहभाग होता. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात महिलेच्या शरीराचा अर्धा भाग जळाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये महिलेचा पती आरोपींची नावे सांगत आहे.