ठाणे: मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एका आरोपीला अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे. ठक्कर असं या व्यक्तीचं नाव आहे. ठक्कर हा एटीएसच्या ताब्यात होता, आता त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात येत आहे. ठक्कर हा या प्रकरणाती महत्त्वाचा आरोपी असल्याने त्याच्याकडून याप्रकरणी आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra ATS nabs SIM card supplier from Gujarat)
ठाणे एटीएसच्या टीमने ठक्करला अहमदाबादमधून अटक केली होती. गेल्या चार दिवसांपासून तो एटीएसच्या ताब्यात होता. ठक्करने सीमकार्ड पुरवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना मदत केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी एटीएसने ठक्करचा कसून तपास केला आहे. आता त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे हिरेन प्रकरणात वापरण्यात आलेल्या सीम कार्डच्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय त्याचा हिरेन हत्येशी काही संबंध आहे का? या दिशेनेही त्याचा तपास केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
वाझेंची प्रकृती बिघडली
रविवारी रात्री सचिन वाझे यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आले. यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हादेखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते. याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते.
नरेश गौरला यूएपीएल लावणार
अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्यावरही UAPA अर्थात Unlawful Activities Prevention Act नुसार कारवाई होणार आहे. हे दोन्ही आरोपी मनसुख हिरेन प्रकरणात सध्या NIAच्या अटकेत आहेत. दरम्यान, जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या विरोधातही NIAने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर NIA ने मोठी कारवाई केली होती. लोकसभेत जुलै 2019 मध्ये या कायद्यातील तरतुदींना मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे. यापूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद या कायद्यात होती. (Maharashtra ATS nabs SIM card supplier from Gujarat)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 March 2021https://t.co/SDhImUuuES
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या:
‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड
(Maharashtra ATS nabs SIM card supplier from Gujarat)