पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चौघा जणांची 26 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे.
भारतीय रेल्वेची बनावट कागदपत्रे
पुणे जिल्ह्यात देहू रोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदारांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे आमिष आरोपीने दाखवले होते. तब्बल 26 लाख रुपये रोख स्वरुपात घेत भारतीय रेल्वेची बनावट कागदपत्रे तयार करत त्याने चौघांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी राहुल धौलपुरिया याने देहू रोडमधील सुरेश राव, सचिन तुळे, वैभव भिगवणकर आणि एक महिला या चारही जणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे सांगितले होते. या सर्वांकडून 26 लाख रुपये घेत यांना कोणतीही नोकरी न लावता भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट पत्राचा उपयोग करून, त्याची बनावट कागदपत्रे तयार करुन या चारही जणांना दिली होती. शासनाची फसवणूक केली म्हणून आरोपी राहुल धौलपुरिया याच्यावर देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फ्लिपकार्ट कंपनीला नऊ लाखांना गंडा
याआधी, पुण्यातील भामट्याने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सप्टेंबर-ऑक्टोबर कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील आरोपीकडून कंपनीला तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात एकून 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
साडीने गळा आवळून वडिलांची हत्या, आत्महत्येचा बनाव, हिंगोलीतील तरुणाचं बिंग आठ महिन्यांनी फुटलं
वडिलांवरील आंधळ्या विश्वासामुळे घात, बारा वर्षांच्या मुलासमोर आई-आजीसह तिघांची निर्घृण हत्या