रायगड : एसटी बस (ST Bus Accident) आणि जेएसडबल्यू बसचा (JSW) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात दोन्ही बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात (Raigad Accident) झाला. अलिबाग- रेवदंडा मार्गावर मुरुड येथून एसटी बस सुटली होती. अलिबागच्या दिशेने जात असताना बसला अपघात झाला. नागावजवळील बागमाळा येथे पेट्रोल पंपाजवळ एसटी आली असता जेएसडबल्यू बससोबत समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की यात दोन्ही बस मधले एकूण 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या अपघातामुळे अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
रायगड जिल्ह्यात एसटी बस आणि जेएसडबल्यू बसचा अपघात झाला. दोन्ही बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. मुरुडहून सुटलेली एसटी बस अलिबागच्या दिशेने जात असताना अलिबाग-रेवदंडा मार्गावर बसला अपघात झाला.
एसटी बस नागावजवळील बागमाळा येथे पेट्रोल पंपाजवळ आली असताना हा अपघात झाला. जेएसडबल्यू बसची एसटी बस सोबत समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघाताची भीषणता इतकी होती की यामध्ये दोन्ही बसमधील जवळपास 55 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावर मोठा ट्रॅफिक जाम झाला होता. या अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
ऊस नेणारा ट्रॅक्टर मागे घसरला, ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चक्काचूर, सोलापुरात भीषण अपघात
भरधाव डंपारने बाप-लेकाला संपवले; सांगलीतील आष्टा मार्गावर भीषण अपघात
आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव