कार्यक्रमासाठी घरी आला अन् घात झाला, भावाच्या वियोगाने बहीण शोकाकुल, कल्याणात काय घडलं ?

| Updated on: Apr 07, 2025 | 8:30 AM

आयुष्याचा काहीच भरोसा देता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ते मुंबईपासून हाकेच्या अतंरावर असलेल्या कल्याणातील एक घटनेमुळे. बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी आलेला भाऊ हसतखेळत बोलला, सगळ्यांची ख्याली खुशाली विचारली. पण थोड्याच वेळात...

कार्यक्रमासाठी घरी आला अन् घात झाला, भावाच्या वियोगाने बहीण शोकाकुल, कल्याणात काय घडलं ?
प्रातिनिधक फोटो
Image Credit source: social media
Follow us on

आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय बऱ्याच वेळा लोकांना येत असतो. सगळेजण आज मेहनत करत, उद्याची स्वप्न रंगवत असतात, चांगल्या भविष्यासाठी धडपडत असतात, पण उद्याचा दिवस दिसेल की नाही अशी परिस्थितीही काही वेळी उद्भवते. एका क्षणात होत्याचं नव्हतं ते होतं आणि हाती उरतं ते फक्त दु:ख.. आयुष्याचा काहीच भरोसा देता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ते मुंबईपासून हाकेच्या अतंरावर असलेल्या कल्याणातील एक घटनेमुळे. बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी आलेला भाऊ हसतखेळत बोलला, सगळ्यांची ख्याली खुशाली विचारली. सगळीकडे चांगलं, आनंदाचं वातावरण होतं, पण थोड्याच वेळात त्याच भावाच्या वियोगामुळे बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि ती शोकविव्हल झाली. कल्याणातील त्या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

बहिणीकडे आलेला तरुण कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेला आणि…

बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या भावाचा अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील रायते पुलाजवळ काल दुपारी उल्हास नदीत पाय घसरून पडल्याने एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाऊसाहेब बारस्कर असे मृत तरूणाचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच हादरले आहेत.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, मृत तरूण भाऊसाहेब हा कल्याणातील त्याच्या बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी रायते येथे आला होता. दुपारच्या सुमारास तो बहिणीसोबत नदीकाठी कपडे धुण्यास गेला असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. यामुळे प्रचंड कोलाहल माजला, पण त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टिटवाळा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर साडेपाचच्या सुमारास भाऊसाहेब याचता मृतदेह हाती लागला.टिटवाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहे. बहिणीकडे आलेल्या भावाच दुर्दैवी अंत झाल्यामुयले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.